नर्मदा आणि उकाईचे पाणी जिल्ह्यात आणणारच- विजयकुमार गावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 12:49 PM2019-10-26T12:49:47+5:302019-10-26T12:50:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढवून या जिल्ह्यातील शेतक:यांना समृद्ध करण्यासाठी नर्मदेतील 11  व उकाईतील पाच ...

Vijaykumar Gavit will bring Narmada and Ukai water to the district | नर्मदा आणि उकाईचे पाणी जिल्ह्यात आणणारच- विजयकुमार गावीत

नर्मदा आणि उकाईचे पाणी जिल्ह्यात आणणारच- विजयकुमार गावीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढवून या जिल्ह्यातील शेतक:यांना समृद्ध करण्यासाठी नर्मदेतील 11  व उकाईतील पाच टीएमसी पाणी जिल्ह्यात आणण्यासाठी आपले सुरुवातीपासून प्रय} आहेत. मध्यंतरीच्या काळात त्याचा पाठपुरावा आपण केला असून आता तर   खासदार डॉ.हिना गावीत यांच्या माध्यमातून थेट पंतप्रधानांर्पयत हा विषय पोहचविला आहे. त्यामुळे हे पाणी कुठल्याही परिस्थितीत जिल्ह्यात आणून शेतक:यांना त्याचा लाभ देणारच अशी ग्वाही आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली. 
विधानसभा निवडणुकीत खान्देशात सर्वाधिक मताधिक्क्याने विजयी होण्याचा मान मिळविणारे आमदार डॉ.विजयकुमार गावीतयांचा ‘लोकमत’तर्फे सत्कार  करण्यात आला. यावेळी ‘लोकमत’चे नंदुरबार कार्यालय प्रमुख रमाकांत पाटील व मनोज शेलार यांनी स्वागत केले. 
यावेळी बोलतांना आमदार डॉ.गावीत यांनी सांगितले, तसे पाहिले तर मी यावेळी सहाव्यांदा निवडणूक लढवली. या 30 वर्षाच्या राजकीय काळात काहींची कामे झाली, काहींची झाली नसेल, विकासाची काही कामे तांत्रिक अथवा राजकीय अडथळ्यांनी रखडली. त्यामुळे काही लोकांची नाराजी जरूर असेल पण या ही स्थितीत जनतेने मला भरभरून मते दिली. माझा राजकीय कारकिर्दीत मी लोकांची प्रामाणिकपणे सेवा केली. त्यातून जिल्ह्यातील बहुतांश लोकांशी एक पारिवारीक संबध जुळले आहेत आणि परिवाराप्रमाणेच आपणही लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा प्रय} करीत आहोत. या जिल्ह्याचा सर्वागीन विकासाचे स्वप्न आपण पाहिले आहे. त्यातील अनेक प्रकल्प मार्गी लागले तर काही रखडले. पण या पाच वर्षाच्या काळात ते कुठल्याही परिस्थितीत पुर्ण करण्याचा निर्धार आपण केला आहे. खासदार डॉ.हिना गावीत यांची त्यात मोलाची साथ लाभणार असल्याने या पंचवार्षिक काळात विकास कामांचा धमाका सुरू करणार असल्याची माहिती आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी दिली. 
जिल्ह्यात सिंचनाला वाव आहे. पुरेसे पाणी आहे. परंतु ते शेतार्पयत पोहचले नाही. त्यामुळे येत्या पाच वर्षात आपले शतप्रतिशत सिंचन करण्याचे ध्येय राहणार आहे. आपल्या हक्काचे नर्मदा आणि उकाईचे पाणी आणावयाचे आहे. नर्मदेचे पाणी बोगद्याद्वारे आणण्याचा आपला संकल्प आहे आणि तो तडीस नेणारच असेही त्यांनी सांगितले. हा प्रकल्प झाल्यास धडगाव, तळोदा आणि शहादासह निम्म्यापेक्षा अधीक जिल्ह्याचा सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. त्यामुळे आपल्या स्वप्नातील काही योजना आहेत त्यात हा प्रकल्प सर्वोच्चस्थानी असल्याचेही आमदार डॉ.गावीत यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील सिंचनाचे 38 प्रकल्पांची किरकोळ दुरूस्तीची  कामे आहेत. अल्प खर्चात ते सुरू होणार आहेत. ते देखील मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जलसंपदामंत्री, मुख्यमंत्री,  केंद्रीय जलसंपदामंत्री यांची भेट घेवून ते मार्गी लावण्याचा प्रय} केले. लोकसभा निवडणुकीनंतर खासदार डॉ.हिना गावीत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून या सर्व प्रकल्पांची             निकड लक्षात आणून दिली. पंतप्रधानांनी वैयक्तिक या सर्व फाईली मागून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हे प्रश्न लवकर मार्गी         लागतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 
शेतीपूरक उद्योग सुरू व्हावे
केवळ शेती उत्पादनावर अवलंबून न राहता शेतक:यांना शेतीपूरक उद्योगासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. पशुपालन, डेअरी उत्पादन, लोकर उत्पादन, फळ व भाजीपाला प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी शेतक:यांना प्राधान्य दिले गेले पाहिजे. शिवाय शेतक:यांसाठी असलेल्या योजना त्यांच्यार्पयत पोहचाव्या, त्यांना त्यांची माहिती व्हावी हा उद्देश महत्त्वाचा आहे. 
रोजगाराला प्राधान्य
सिंचनासह जिल्ह्यात रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. नंदुरबारसह शहादा, नवापूर येथील औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लावायचा आहे. पंतप्रधानांचा स्किल्स डेव्हलपमेंटचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविल्यास स्थानिक ठिकाणीच रोजगार          उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रमही प्रभावीपणे राबविणार आहे. नंदुरबारच्या एमआयडीसीमध्ये मोठे उद्योजक यावेत यासाठी            खासदार डॉ.हिना गावीत यांनी             काही उद्योजकांशी चर्चा देखील केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वैयक्तिक योजनांचा लाभ
सामुहिक लाभापेक्षा व्यक्तीगत योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया ही किचकट असते. परंतु आपला आणि खासदारांचा उद्देश हा वैयक्तिक लाभाच्या योजना देण्यावर जास्त              भर असतो. उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ जास्तीत जास्त कुटूंबांना दिला गेला. त्यामुळे अनेक महिलांचे मोठे कष्ट वाचले. बांधकाम मजुरांची नोंदणी करणे, त्यांना किट वाटप करण्याची योजना असूनही तीची अंमलबजावणी होत नाही. परंतु आपण ती योजना प्रभावीपणे राबविली. अनेकांचा त्याचा फायदा झाला. यापुढे देखील वैयक्तिक लाभाच्या योजना प्रभावी राबविण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे.
प्रशासन गतिमान करण्यासाठी आता आपण लक्ष घालणार आहोत. योजनांचा निधी कुठे येतो, किती खर्च होतो, किती परत जातो, किती कामे होतात याचा काही ताळमेळ राहत नाही. त्यामुळे आता आपण आणि खासदार दर महिन्याला बैठका घेणार. बैठकांमध्ये झालेल्या चर्चा आणि निर्णयांचा फोलोअप घेत राहणार आणि कामे करण्यावर भर देणार असल्याचे आमदार डॉ.गावीत यांनी स्पष्ट केले. 
मेडिकल कॉलेज वर्षभरात सुरू होणार..
मेडिकल कॉलेज येत्या वर्षात सुरू करण्यासाठी प्रयत्न आहे. जिल्हा रुग्णालय हस्तांतरण प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच इन्फ्रास्ट्रर उभे करण्यासाठी संबंधीत विभागाकडे पाठपुरावा सुरू राहणार आहे.
योजनांमध्ये खोडा घालण्यापेक्षा त्याची उपयुक्तता जाणून घ्या
योजना राबवितांना आणि विकास कामे करतांना आता सहमतीचे राजकारण करणार. आतार्पयत योजनांना खोडा घालण्याचेच काम झाले आहे. योजना किती आणि कशी लाभदायी आहे त्याचा अभ्यास केला जात नाही. त्यामुळे विकास खुंटतो. ते होऊ नये यासाठी आपला प्रय} राहणार आहे. 
मंत्रीपदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील..
गेल्या पाच वर्षात मंत्रीपदासाठी आपण मागणी केली नव्हती, लोकांची कामे करण्यावर आपला भर होता. यावेळी मंत्रीपदाबाबत पक्षश्रेष्ठीच योग्य तो निर्णय घेतील.
 

Web Title: Vijaykumar Gavit will bring Narmada and Ukai water to the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.