नंदुरबारचे ग्रामदैवत मोठा मारूती देवस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:03 PM2018-03-31T12:03:19+5:302018-03-31T12:03:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहराचे ग्राममदैवत असलेल्या मोठा मारोती मंदिराची निर्मिती साधारण 1858 साली करण्यात आल्याचा दाखला आह़े तत्पूर्वी याठिकाणी पंचगव्यापासून निर्माण करण्यात आलेली मूर्ती चौथ:यावर असल्याची माहिती आह़े कालांतराने ही मूर्ती दुभंगल्याने पूर्ण पाषाणात नवीन मूर्ती घडवून मंदिराचा जीर्णोद्वार करण्यात आला होता़ नंदनगरीतील भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या मोठा मारूती देवस्थानात भाविकांची कायम उपस्थिती असत़े
मनोरथ पूर्ण करणारा हनुमान अशी ख्याती असलेल्या मोठा मारूती मंदिराची निर्मिती तत्कालीन मंहतांनी केली होती़ याठिकाणी राधाकृष्ण, रामसिता, विठ्ठल-रूख्माई, गणपती, संत दगा महाराज यासह मोठा मारूतीची 11 फूट उंचीची मूर्ती आह़े दक्षिण मुखी असलेल्या या मारूतीची उपासना करण्यासाठी पहाटेपासून भाविक मंदिरात येतात़ नंदुरबार शहरातील प्रसिद्ध उद्योगपती गोवर्धन रघुवंशी यांनी जयपूर येथून कारागिर बोलावून घेत 11 फूटाची मूर्ती घडून घेतली होती़ या मूर्तीचा 50 वर्षापूर्वी पारंपरिक पद्धतीने जीर्णोध्दार करण्यात आल्याची माहिती मंदिराचे पुजारी विलास जोशी यांनी दिली़
मंगळवार आणि शनिवारी याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी उसळत़े हनुमान जयंतीनिमित्त मंदिराच्या विश्वस्त मंडळाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यात पहाटे पाच वाजता हनुमान चालिसा पठण होणार आहे तर, सकाळी सहा वाजून 5 मिनीटांनी महाबली हनुमानची महाआरती व साडे अकरा वाजता भाविकांसाठी महाप्रसाद वाटप होणार आह़े शुक्रवारी हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला विविध मंदिराची साफ -सफाई करून रंगरंगोटी करण्यात येत असल्याचे चित्र दिसून आल़े ग्रामदैवत मोठा मारूती मंदिराचा सहा वर्षापूर्वी लोकवर्गणी गोळा करून जिर्णोधार करण्यात आला आहे. मंदिरात सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा माफक दरात विविध समारंभासाठी मंदिराच्या खालच्या बाजूला सभागृहाचे निर्माण करण्यात आले आहे. शहरात सर्वात जुन्या हनुमान मंदिरापैकी मोठा मारूती मंदिर आह़े या मंदिराचा सांभाळ करण्यासाठी पूर्वी संन्यस्त असलेल्या व्यक्तीची निवड केली जात होती़ ब्रrाचारी असलेल्या या व्यक्तीला या मंदिराची पूर्ण जबाबदारी देण्यात येत होती़ परंपरेनुसार देण्यात येणारी ही गादी आता विलास जोशी महाराज सांभाळत आहेत़ संन्यस्त व्यक्तीला देण्यात येणा:या जबाबदारीची परंपरा सहा वर्षापूर्वी मोडीत काढत जोशी यांना ही गादी सोपवण्यात आली आह़े मंदिरात हनुमान जयंतीसह विविध सण साजरा करण्याची मोठी परंपरा आह़े