गाव तिथं एसटीचा मार्ग ‘खडतरच’
By admin | Published: June 26, 2017 02:36 PM2017-06-26T14:36:28+5:302017-06-26T14:36:28+5:30
अक्कलकुवा आगराकडून रस्त्यांचे सव्रेक्षण : चालक-वाहकही झाले बेजार
Next
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.26 - पावसाळा सुरु असल्याने यामुळे जिल्ह्यात ब:याच ठिकाणीच्या रस्त्यांची दुरावस्था झाली आह़े त्यामुळे याचा सर्वाधिक त्रास एसटी महामंडळाच्या चालक-वाहकांना होत आह़े त्यामुळे ‘गाव तिथं एसटी’ असे ब्रिदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाच्या बसेसना खडतर प्रवास करावा लागत आह़े
अक्कलकुवा आगाराच्या आगार प्रमुख अनुजा दुसाने यांना आगाराच्या कामगार युनियनतर्फे निवेदन देऊन आपल्या व्यथा मांडण्यात आल्या आहेत़ अक्कलकुवा आगाराकडून अक्कलकुवा व तळोदा तालुक्याला बससेवा पुरविण्यात येत असत़े अनेक ग्रामस्थ बस थेट आपल्या गावार्पयत यावी यासाठी अजर्फाटे करीत असतात़ परंतु काही वेळा गावात येण्यासाठी रस्तेच व्यवस्थीत नसल्याने एसटी महामंडळाला नाईलास्तव येथे बससेवा सुरु करता येत नाही़ केलीच तर त्यात मोठय़ा प्रमाणात अडथळे निर्माण होत असतात़ ज्या मार्गावर सध्या बससेवा सुरु आहेत़ ते मार्गदेखील खडतर असल्याचे अक्कलकुवा आगार प्रमुख दुसाने यांनी सांगितल़े त्यामुळे दोन्ही तालुक्यातील कुठले मार्ग खडतर आहेत़ याचे आता अक्कलकुवा आगाराकडून सव्रेक्षणच करण्यात येणार असल्याचीही माहिती दुसाने यांनी लोकमतशी बोलताना दिली़