दिवसाला 1 लाख लीटर पाणी देणारं गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:59 PM2018-05-13T12:59:47+5:302018-05-13T12:59:47+5:30
लोकसहभागाची जलयुक्ती : दोन वर्षात ठाणेपाडा बनलं पाणीदार गाव
भूषण रामराजे ।
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 13 : सर्वत्र जलसंकट तीव्र होत असताना ठाणेपाडा ता़ नंदुरबार येथे ग्रामस्थांना दिवसाला 1 लाख 10 हजार लीटर पाणी वाटप केलं जात आह़े जलयुक्तच्या माध्यमातून वॉटर बजेट ही संकल्पना प्रत्यक्षात उतरणा:या ठाणेपाडा या गावाची ही पाणीदार कहाणी़़़
26 जानेवारी 2016 पासून राज्यात प्रत्यक्ष जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना सुरुवात झाली होती़ यात जिल्ह्यातील इतर गावांसोबतच ठाणेपाडा गावानेही सहभाग नोंदवला होता़ केवळ सहभागावर न थांबता योजनेला लोकसहभागाची युक्ती देत गावाने गावाची भूजल पातळी वाढवली आह़े
नंदुरबार शहरापासून दक्षिणेला नाशिक- नंदुरबार रस्त्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावरचं 3 हजार 488 लोकवस्तीचं टुमदार गाव़ आदिवासी समुदायासह सर्वच जाती धर्माचे 722 कुटूंब याठिकाणी राहतात़ प्रामुख्याने शेती हा व्यवसाय असलेल्या या गावशिवारातील माती काळी परंतु खडकाळ असल्याने कांदा हेच प्रमुख पीक़ तीन वर्षापूर्वी गावात फेब्रुवारी ते जुलै हा कालखंड म्हणजे जलसंघर्षाचा़ गावाची पाणी योजना कोरडी, शिवारातील विहिरी तळ गाठायच्या दरवर्षी पडणा:या या दुष्काळामुळे रब्बी कांदा घेणारे शेतकरी शेवटचा हंगाम सोडून देत होत़े डोंगराळ भागात असल्याने गावाला पाणी मिळणंच दुरापास्त होत होतं़ यावर मात करण्याची संधी येथील ग्रामपंचायतीला जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून मिळाली आणि गाव पाणीदार झालं़ गावाच्या जलयुक्तीची माहिती जाणून घेतली असता, अनेक वर्षाचा जलसंघर्ष समजून आला़ गावाच्या दक्षिणेला डोंगरात उंचीवर ‘कापरा’ (ठाणेपाडा 1) हा 40 वर्षापूर्वी वनविभागाच्या हद्दीत बांधलेला तलाव आह़े या तलावाच्या पाण्यावर शेती आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन ठाणेपाडा गावात केले जात होत़े वनविभागाच्या ताब्यात असल्याने त्यातून पाणी सहजासहजी मिळत नव्हतं़ यामुळे शेतक:यांनी लघुतलावातून वाहून जाणा:या पाण्याला खालच्या भागातून वाहणा:या नाल्यात आणलं़़ पाणी जिंकण्याची ग्रामस्थांची ही पहिली पायरी़ यातून बव्हंशी टंचाई दूर होत असली तरी परिपूर्ण पाणीपुरवठा होत नव्हता़ ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच देवमन पवार, तत्कालीन ग्रामसेवक विनोद ढोढरे यांनी वेळोवेळी ग्रामसेवकांच्या बैठका घेत पाण्याचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिल़े यातून दोन वर्षापूर्वी जलयुक्तची कामे सुरू झाली होती़ यातून ग्रामस्थांनी तांबेबारा (ठाणेपाडा-2) या प्रकल्पाचा गाळ लोकसहभागातून हाताला हात देत काढून घेतला़ त्यानंतर आलेल्या पहिल्या पावसात 60 टक्के आणि नंतर तुडूंब भरलेल्या या प्रकल्पातून पाणी थेट शिवारात आलं़ गावच्या पाणी योजनेची भूजल पातळी दीड मीटर्पयत वाढली़ यामुळे दुष्काळ पडलाच तरीही ठाणेपाडा गावाला 10 वर्षे पुरेल एवढे पाणी गाव विहिरीतून देता येणे शक्य झाले आह़े
जलयुक्तीद्वारे सुरू झालेला लोकसहभागाचा लोकविचार आजही गावात कायम आह़े यामुळे का होईना, पाणीदार गावावरच न थांबता येत्या काळात ठाणेपाडा गाव वनपर्यटनासाठी तयार करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून सुरू करण्यात आला आह़े
वॉटर व्हिलेज निर्माण करण्याचा संकल्प
गावात गेल्या 2 वर्षात नाल खोलीकरण, सिमेंट बांध दुरुस्ती, माती बांध दुरुस्ती, नवीन साठवण बंधारा, विहीर पुनर्भरण, सीसीटी, मजगी, पाणी पिकाऊ खड्डे यांची निर्मिती करण्यात आली होती़ यात पाणी ङिारपत जाऊन शिवारातील पाण्याची पातळी वाढत गेली़ भूजल सव्रेक्षण विभागाने रिचार्ज स्ट्रेंज आणि रिचार्ज शाफ्ट या जलपुनर्भरणाच्या दोन पद्धती येथे राबवल्या होत्या़ यातून विहिरींचे पाणी हे 10 फूटांवर आले आह़े
शेतात पाण्याची नासाडी होऊ नये, म्हणून शेतकरी ठिबक सिंचनावर भर देत आहेत़ ठिबक सिंचनावर कांदा पिकवणारे ठाणेपाडा हे बहुदा नंदुरबार जिल्ह्यातील पहिले गाव असाव़े
आजघडीस ग्रामसेवक विजय होंडगर आणि सरपंच भारती देवमन पवार यांच्या संकल्पाने वॉटर कप स्पर्धेत ग्रामस्थांचा समावेश आह़े यात लोकसहभागातून दगडी बांध आणि मातीबांध बांधकामाचा आराखडा तयार आह़े लवकरच या कामांना सुरुवात होणार आह़े
ग्रामसेवक विजय होंडगर यांच्यासोबत संवाद साधला असता, त्यांनी ग्लोबल किंवा आयडीयल व्हिलेज ऐवजी वॉटर व्हिलेज असाच संकल्प आता करण्याची गरज आह़े कारण जल है तो कल है असे सांगितल़े