वाल्हेरी नदीवरील पुलाच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ
By admin | Published: January 20, 2017 12:34 AM2017-01-20T00:34:34+5:302017-01-20T00:34:34+5:30
सोमावल : तळोदा तालुक्यातील वाल्हेरी ते एकधड गावादरम्यान असलेल्या देववाल्हेरी नदीवर पूल नसल्याने वाहनधारकांसह विद्यार्थी व शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत आहेत़
सोमावल : तळोदा तालुक्यातील वाल्हेरी ते एकधड गावादरम्यान असलेल्या देववाल्हेरी नदीवर पूल नसल्याने वाहनधारकांसह विद्यार्थी व शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत आहेत़ प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े
ग्रामस्थांनी वारंवार पुलाची मागणी करूनदेखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झालेले असल्याचा आरोप करण्यात येत आह़े तालुक्यातील देववाल्हेरी नदीवरील अपूर्ण अवस्थेत असलेल्या पुलामुळे वाहनधारकांना ये-जा करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात कसरत करावी लागत आह़े तसेच परिसरातील विद्याथ्र्यानाही शाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आह़े
नदीच्या पात्रात असलेल्या मोठ-मोठय़ा दगडांमधून मार्ग काढावा लागत आह़े तसेच इतर चारचाकी वाहनांचीदेखील अशीच काहीशी परिस्थिती आह़े परिसरातील ग्रामस्थांना पावसाळ्यात याचा मोठय़ा प्रमाणात त्रास होतो़ पावसाच्या पाण्यामुळे परिसरात संपूर्ण चिखल पसरलेला असतो़ त्यामुळे त्यातून वाट काढणे अवघड असत़े
2015 साली परिसरात आलेल्या पुरात वाल्हेरी येथील अमरसिंग वसावे यांना आपला प्राणदेखील गमवावा लागला होता़ देववाल्हेरी नदीवर पुलाचे बांधकाम अपूर्ण आह़े त्यामुळे बांधकाम पूर्ण करण्याबाबत ग्रामस्थांकडून सतत पाठपुरावा करण्यात येत आह़े परंतु तरीदेखील याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने यामुळे ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त कण्यात येत आह़े पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी करण्यात येत आह़े
दरम्यान, रात्रीच्या वेळी पुलावरुन वाहतूक करणे धोकेदायक ठरत आह़े पुलाचे बांधकाम अपूर्ण झाले असून व उर्वरित भाग कच्चा असल्याने रात्रीच्या वेळी अंधारात वाहन चालविताना अंदाज येत नसल्याने अनेकवेळा अपघातदेखील झाले आह़े त्यामुळे अनेक ग्रामस्थ यामुळे नाराज आहेत़ प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यावरही यावर कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांना मनस्ताप होत आह़े (वार्ताहर)