बिबटय़ाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याने ग्रामस्थ संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:02 PM2019-08-25T12:02:48+5:302019-08-25T12:02:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : मध्यप्रदेशातील पानसेमल तालुक्यातील जुनापाणी शिवारातील शेतात चारा कापत असलेल्या महिलेवर बिबटय़ाने अचानक हल्ला करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खेतिया : मध्यप्रदेशातील पानसेमल तालुक्यातील जुनापाणी शिवारातील शेतात चारा कापत असलेल्या महिलेवर बिबटय़ाने अचानक हल्ला करून तिला ओढत नेऊन लचके तोडून जागीच ठार केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान याप्रकरणी घटना घडताच वनविभागावर राग व्यक्त करण्यासाठी संतप्त जमाव वनविभागाच्या कार्यालयावर चालून आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या पानसेमल तालुक्यातील जुनापाणी शिवारात रवींद्र रंगराव पाटील यांच्या शेतात चारा कापत असलेल्या बेरीबाई कांतीलाल भिल (45) या महिलेवर बिबटय़ाने अचानक हल्ला केला. या वेळी महिलेला बिबटय़ाने दूर्पयत ओढत नेऊन तिचे लचके तोडून जागीच ठार केले. बिबटय़ाने बेरीबाईला ओढून नेल्याचे लक्षात येताच त्यांचे पती व आजूबाजच्या लोकांनी पडलेल्या रक्ताच्या थेंबावरून शोधाशोध केली व बिबटय़ाला हुसकावून लावले तो र्पयत बेरीबाई ठार झाल्या होत्या. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, वनविभागाचे वनक्षेत्रपाल मंगेश बुंदेला यांनी आपल्या सहका:यांसह घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छदनानंतर प्रेत नातेवाईकांना ताब्यात दिले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान या प्रकरणी संतप्त जमावाने वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा वळवला. सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने चार ते पाच पिंजरे लावली असून, बडवाणी येथून आणखी पाच ते सहा पिंजरे मागविण्यात येणार आहेत. या प्रकरणी मयताच्या कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून 11 हजार रुपये देण्यात आले. शवव्छिेदनाचा अहवाल आल्यानंतर चार लाखाची शासकीय मदत दिली जाणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक के.एस. पट्टा व प्रांताधिकारी विजय गुप्ता यांनी दिली.