श्रमदानातून ग्रामस्थांनी अडविले बंधा:याचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 09:59 PM2019-08-23T21:59:25+5:302019-08-23T21:59:31+5:30
ईश्वर पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कवळीथ बंधा:यातून निघणारी मुख्य पाटचारीची भिंत फुटल्याने शेती ...
ईश्वर पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कवळीथ बंधा:यातून निघणारी मुख्य पाटचारीची भिंत फुटल्याने शेती सिंचन व तलाव भरण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर मात करण्यासाठी शासनाच्या मदतीवर विसंबून न राहता मोहिदे त.श. येथील ग्रामस्थांनी श्रमदान करून वाहून जाणारे पाणी अडविण्याचा उपक्रम राबवला. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
कवळीथ बंधा:यातून निघणारी पाटचारी लोणखेडा, पुरुषोत्तमनगर, डोंगरगाव, सोनवद, शिरुड दिगर, वरुळ कानडी, करजई या सुमारे दहा गावांची जीवनवाहिनी समजली जाते. कारण सोनवद येथील एक बंधारा, मोहिदा येथील सहा, सावळदा दोन, वरुळ कानडी एक, करजई एक असे तब्बल 12 बंधारे या पाटचारीतील पाण्याने भरली जातात. पाटचारी प्रवाहीत राहत असल्याने कुपनलिका व विहिरींची पाण्याची पातळीही टिकून राहते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटतो. या पाण्याचा खरीप व रब्बी हंगामालाही मोठा फायदा होतो. गोमाई नदीवर मध्य प्रदेशात मालकातर परिसरात मोठे धरण बांधले गेले आहे. त्यामुळे ही नदी क्वचितच प्रवाहीत राहते. त्यात पाटचारी फुटल्याने वरील गावांचा पाणीप्रश्न गंभीर होईल ही शक्यता लक्षात घेता मोहिदे त.श. येथील माजी सरपंच जाधव संभू पाटील, भाऊभाई पाटील, शहादा तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक रमाकांत मंगेश पाटील, मोहिदे त.श. विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन टी.बी. पटेल, सोनवदचे जयवंत पाटील, पुंडलिक भाऊसाहेब पाटील, उद्योजक शेतकरी किशोर नरोत्तम पाटील या ज्येष्ठ नागरिकांनी विचार-विनिमय करून गावातील युवकांना सोबत घेतले. पुराच्या पाण्यात वाहून गेलेली पाटचारीची भिंत एक हजार खताच्या रिकाम्या गोण्यांमध्ये वाळू भरून सुमारे पाटचारीची भिंत व दुस:या बाजूची सुमारे एक हजार फूट भिंतीची डागडूजी केली. तसेच मुख्य पाटचारीच्या मधोमध एक हजार फूट खडक पोकलॅण्ड मशिनच्या साह्याने फोडण्यात आला व दोन फूट उंचीचा गाळ जेसीबी मशिनच्या सहाय्याने काढण्यात आला. पाटचारीच्या मधोमध असलेला अजस्त्र खडकाचा अडथळा शासनाच्या पाटबंधारे विभागातील अधिका:यांच्या कधीच लक्षात आला नाही. तो अडथळा श्रमदानातून काढल्याने अवघ्या 36 तासात वरुळ-कानडीर्पयत पाणी पोहोचले. अन्यथा हे पाणी तेथर्पयत पोहोचण्यासाठी चार ते पाच दिवस लागायचे. या महाश्रमदानात माजी सरपंच जाधव संभू पाटील, भाऊभाई पाटील, रमाकांत मंगेश पाटील, टी.बी. पाटील, नरोत्तम पाटील, सोनवलचे जयवंत पाटील, पुंडलिक पाटील, कल्याण पाटील, राजेंद्र पाटील, डॉ.डायाभाई पाटील, योगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र पाटील, भगवान पाटील, सुभाष पाटील, भरत पाटील, भगवान पाटील, रामकृष्ण पाटील, नितीन पाटील, रिंकू पाटील, मनीष पाटील, ऋषिकेश पाटील, धर्मा पाटील, प्रणय पाटील, चेतन पाटील, सोनू धनगर, कैलास पाटील, नेहल पटेल, दिनेश पाटील, डॉ.रितेश पाटील, डॉ.विवेक पाटील, नंदलाल फोटोग्राफर, दिनेश पाटील, उमाकांत पाटील, नंदलाल पाटील, प्रवीण पाटील, शरद पाटील, हिरालाल पाटील, गणेश पाटील, शांतीलाल पाटील, भूषण पाटील व तरुणांनी सहभाग घेतला. पाटचा:यांची देखरेख करण्याचे काम पाटबंधारे विभागाचे आहे. मात्र पाटबंधारे विभागाच्या सुस्तावलेल्या व कामचुकार अधिकारी, कर्मचा:यांनी कवळीथ बंधा:यातून निघणा:या पाटचारीकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष केल्याने शेतातील महत्त्वाची कामे सोडून मोहिदे त.श. येथील जागरूक नागरिकांनी श्रमदानातून मोठे काम केले. युवकांनीही या विधायक कामाला श्रमाची जोड दिल्याने परिसरात या विधायक कामाची एकच चर्चा होत आहे.