पायपीट करुन विद्यापीठ गाठत विद्यावाचस्पती बनलेल्या ‘भूमिपुत्राचा’ ग्रामस्थांनी केला गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 12:35 PM2019-12-07T12:35:28+5:302019-12-07T12:35:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तºहावद ता़ तळोदा येथील ग्रामस्थांनी गावाचे नाव उज्ज्वल करत पीएचडी मिळवणाऱ्या भूमिपुत्राचा महापरीनिर्वाण दिनाचे ...

The villagers honored the 'Bhumiputra', who is going to university to be beaten. | पायपीट करुन विद्यापीठ गाठत विद्यावाचस्पती बनलेल्या ‘भूमिपुत्राचा’ ग्रामस्थांनी केला गौरव

पायपीट करुन विद्यापीठ गाठत विद्यावाचस्पती बनलेल्या ‘भूमिपुत्राचा’ ग्रामस्थांनी केला गौरव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तºहावद ता़ तळोदा येथील ग्रामस्थांनी गावाचे नाव उज्ज्वल करत पीएचडी मिळवणाऱ्या भूमिपुत्राचा महापरीनिर्वाण दिनाचे औचित्य साधून गौरव केला़ गावात अनेक वर्षात बसची सोय नसल्याने पायपीट करत शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत गावातील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम झाला़
प्रा़डॉ़जितेंद्र भिमराव बागुल असे पीएचडी प्राप्त करणाºया भूमिपुत्राचे नाव असून गेल्या आठवड्यात त्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली़ त्यांनी ए कम्पॅरिटीव्ह स्टडी आॅफ ह्युमन रिलेशनशिप इन द सिलेक्ट नॉव्हेल्स आॅफ अनिता देसाई अ‍ॅण्ड गीथा हरीहरन या इंग्रजी साहित्यावर आधारित विषयाचा अभ्यास करुन ही पदवी प्राप्त केली़
तºहावद हे गाव गुजरात आणि शहादा तालुक्याच्या सिमेवर आहे़ गावातून १० वर्षापूर्वी वाहतूकीची साधने नसल्याने येथील विद्यार्थी शिक्षणासाठी प्रकाशा ता़ शहादा येथे पायी जावून शिक्षण घेत होते़ यातील एक विद्यार्थी म्हणून प्रा़ डॉ़ जितेंद्र बागुल हे परीचित आहेत़ दर दिवशी इतर विद्यार्थ्यांसोबतच पायपीट करणाऱ्यांपैकी जितेंद्र बागुल यांनी विद्यापीठातून पीएचडी मिळवल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला होता़ दरम्म्यान तºहावद येथील बौद्ध समाजातून प्रथमच पीएचडी प्राप्त केल्याने सर्वधर्मिय ग्रामस्थ तसेच नोकरीनिमित्त इतर शहरे व परराज्यात स्थिरावलेल्या बांधवांनी एकत्र त्याचा गौरव केला़ महापरीनिर्वाण दिनी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली म्हणून हा उपक्रम झाला़ प्रारंभी ग्रामस्थांनी सामूहिक बुद्धवंदना केली़ यानंतर प्रा़ बागुल यांचा कुटूंबियांसह गौरव करण्यात आला़
यावेळी गोविंद शिरसाठ, भरत शिरसाठ, आनंद शिरसाठ, देवानंद शिरसाठ, ईश्वर सामुद्रे, पोलीस पाटील सुनिल शिरसाठ, चतुर चित्ते, प्राचार्य भारती शिरसाठ, संजय निकुंभे, पूनमचंद सामुद्रे, सुनंदाबाई शिरसाठ, मायाबाई सामुद्रे, सविता शिरसाठ, शितल शिरसाठ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते़

Web Title: The villagers honored the 'Bhumiputra', who is going to university to be beaten.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.