बिबटय़ांनी झाडावर मुक्काम ठोकल्याने ग्रामस्थांचे जागरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:08 PM2019-08-28T12:08:42+5:302019-08-28T12:08:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : कळमसरे ता़ तळोदा शिवारातील शेतात वडाच्या झाडावर नर व मादी बिबटय़ाने दोन दिवस मुक्काम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : कळमसरे ता़ तळोदा शिवारातील शेतात वडाच्या झाडावर नर व मादी बिबटय़ाने दोन दिवस मुक्काम केल्याने शेतकरी व ग्रामस्थांची एकच पळापळ झाली़ बिबटय़ाच्या मुक्कामामुळे कळमसरे, मोहिदे आणि मोड या गावातील शेतक:यांनी दोन रात्री जागून काढल्या़ रविवारी दुपारी मोड येथील शेतकरी पुरुषोत्तम चौधरी यांच्या कळमसरे शिवारातील शेतात गेलेल्या मजूरांना बिबटय़ा दिसून आला होता़ यावेळी मजूरांनी मोड गावाकडे येत माहिती दिली होती़ शेतकरी चौधरी यांच्यासह मोड, मोहिदे आणि कळमसरे येथील ग्रामस्थांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, बिबटय़ाच्या पावलांच्या ठसे दिसून आल़े दरम्यान शेतकरी परत आले होत़े रात्री काही शेतकरी ऊसाला पाणी देण्यासाठी गेले असता, चौधरी यांच्या कळमसरे गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतातील वडाच्या झाडावर दोघे बिबटे ठाण मांडून असल्याचे दिसून आल़े ही माहिती कळमसरे गावात पोहोचल्यानंतर त्यांची धावपळ सुरु झाली़ यातून रविवार आणि सोमवार अशा दोन रात्री कळमसरे आणि मोहिदे गावातील नागरिकांनी जागून काढत गुरे-ढोरे, शेळ्या-मेंढय़ांच्या रक्षणासाठी खडा पहारा दिला़ दरम्यान मंगळवारी दुपारी तळोदा येथील वनविभागाच्या पथकाने याठिकाणी भेट देत पाहणी केली होती़ नर आणि मादी बिबटय़ा असल्याचा अंदाज वर्तवत वनविभागाने या भागात पिंजरे लावण्याबाबत अनुकुलता दर्शवली आह़े
नुकतीच मध्यप्रदेशातील खेतिया परिसरात महिलेला बिबटय़ाने ठार केल्याची घटना घडली आह़े यातच कळमसरे शिवारात दोन बिबटे आढळून आल्याने ग्रामस्थ व शेतक:यांमधून भिती व्यक्त होत आह़े
कळमसरे गावापासून अवघ्या 100 मीटर अंतरावरील झाडावर बिबटे बसून असल्याने गावातील 37 घरांमधील प्रत्येकाने दोन रात्री जागून काढल्या़ गावातील अनेकांनी रविवारीच वनविभागाला संपर्क केल्याची माहिती आह़े परंतू पहाटेपासून बिबटे नाहिसे झाले होत़े सोमवारी सायंकाळी पुन्हा ते झाडावर जाऊन बसले होत़े रात्री उशिरा ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनक्षेत्रपाल निलेश रोडे यांनी पथक पाठवले होत़े पथकाने मंगळवारी सकाळी तपासणी केली असता, बिबटे तेथून उत्तर दिशेने पुढे निघून गेल्याचे दिसून आल़े दरम्यान दोघा बिबटय़ांचा शोध घेण्यासाठी तळोदा वनविभागाचे उपवनसंरक्षक एकनाथ चौधरी यांनी वनक्षेत्रपाल निलेश रोडे, एऩजी़पाटील, अशोक पाटील, एल़टी़पावरा, आऱजी़शिरसाठ, श्रावण कुवर यांचे पथक नियुक्त केल्याची माहिती दिली आह़े
तळोदा तालुक्यात बिबटय़ांनी केलेल्या हल्ल्याच्या घटना लक्षात घेता प्रशासनाने या प्रकाराकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी आह़े ऊसाच्या शेतात बिबटय़ांचा संचार वाढण्याचे संकेत मिळू लागल्याने ऊस उत्पादक चिंतेत असून वनविभागाने यंदा ठोस उपाय करण्याची मागणी आह़े