शाश्वत स्वच्छतेवर गावांनी भर द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 11:37 AM2020-12-07T11:37:45+5:302020-12-07T11:37:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माझी वसुंधरा अभियानांतर्गत निवड झालेल्या प्रकाशा व लोणखेडा ता. शहादा येथील ग्रामपंचायतींच्या सरपंच, पदाधिकारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : माझी वसुंधरा अभियानांतर्गत निवड झालेल्या प्रकाशा व लोणखेडा ता. शहादा येथील ग्रामपंचायतींच्या सरपंच, पदाधिकारी व ग्रामसेवक यांना सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन,वृक्ष लागवड व संवर्धन याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड.सीमा वळवी ,मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रकाशा व लोणखेडा या दोन ग्रामपंचायतीची माझी वसुंधरा अभियानात निवड करण्यात आली आहे. अभियानात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, वृक्ष लागवड व संवर्धन या उपक्रमांची अंमलबजावणी व व्यवस्थापन या बाबींसाठी एक हजार गुण आहेत.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायती ना मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने अभियानाचे नोडल ऑफिसर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ व उपमुख्य कार्यकारी अधिकारी( पावस्व) डॉ. वर्षा फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत उपस्थितांना बनवडी ता. कराड जि. सातारा येथील ग्राम विकास अधिकारी दिपक हेळुंके यांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच व्यवस्थापनामुळे शाश्वत स्वच्छता राहण्यास कशी मदत होते व त्यातून ग्रामपंचायतीस कशाप्रकारे उत्पन्न मिळते याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
तर कसबे वणी ता.दिंडोरी जि. नाशिक येथील ग्राम विकास अधिकारी जी.आर .आढाव यांनी वृक्ष लागवड ,त्यांचे संवर्धन व भविष्यात यातून ग्रामपंचायतीस मिळणारे उत्पन्न याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ.वर्षा फडोळ यांनी केले यावेळी गटविकास अधिकारी आर .बी. घोरपडे ,विस्तार अधिकारी (पंचायत) सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.