वैधमापन सहायक नियंत्रकाची तळोदा कार्यालयाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:22 AM2021-01-13T05:22:20+5:302021-01-13T05:22:20+5:30
अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे कार्यालय तळोदा येथे सुरू करण्यात आले असून, या कार्यालयामार्फत तळोदा व ...
अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे कार्यालय तळोदा येथे सुरू करण्यात आले असून, या कार्यालयामार्फत तळोदा व अक्कलकुंवा तालुक्यात वैधमापनाचे कार्य केले जाते. यात विविध परिमाणांची पडताळणी व मुद्रांकनाच्या कामासह अन्य समावेश आहे. तळोद्यात दर सोमवारी हे कार्यालय सुरू राहत असून, ११ महिने क्षेत्रीय भेटीचे व कॅम्प आयोजित करण्यात येत असल्याची माहिती यावेळी एन.पी. जोशी यांनी दिली.
दरम्यान, विभागाच्या दुरुस्तकाबाबत तक्रार अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. त्या तक्रारीच्या चौकशीकामी एन.पी. जोशी तळोद्यात आले होते. याप्रसंगी तळोदा वैधमापन कार्यालयाचे निरीक्षक गोसावी हे उपस्थित होते. तळोदा येथील अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे वैधमापनशास्त्र निरीक्षक कार्यालय हे धुळे येथील सहायक नियंत्रक कार्यालयाच्या अखत्यारीत येत असल्याने या कार्यालयासंबंधी अथवा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणाबाबत तक्रार असल्यास धुळे येथील कार्यालयात करावी, असे आवाहन जोशी यांनी केले आहे. तळोदा येथील भेटीत प्राप्त तक्रारीची शहानिशा, व्यापारी भेट आदी बाबी केल्या जाणार आहेत. मात्र, तक्रारीबाबत तसेच चौकशीबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.