अक्कलकुवा तालुक्यातील उमरकुवा येथील महिलेची अंनिसकडून भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 06:58 PM2019-02-12T18:58:15+5:302019-02-12T18:58:20+5:30
कारवाईची मागणी : डाकीण असल्याच्या संशयातून झाली होती मारहाण
कोठार : उमरकुवा ता. अक्कलकुवा येथे डाकीण ठरवुन मारहाण केलेल्या पीडित महीलेची महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली़
उमरकुवा येथे डाकीण असल्याच्या संशयातून एका महिलेस मारहाण झाली होती़ मारहाणीत पिडित महिलेचा हात मोडला आहे़ पीडित महिलेचा हात मोडला होते. दरम्यान महिलेच्या फिर्यादीवरुन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ परंतू जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणे आवश्यक असतांना अन्य कलमांखाली संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला होता़ या पार्श्वभूमीवर अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ़ डी.बी.शेंडे, तळोदा कार्याध्यक्ष मुकेश कापुरे, अमोल पाटोळे, अनिल निकम, पोलिस कॉन्स्टेबल अनिस गावित यांनी महिलेची भेट घेत तिला धीर दिला़ यावेळी कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा करुन अंधश्रद्धेविरोधात प्रबोधन करुन येत्या काळात कार्यक्रम घेण्याचे सांगितले़ कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे यांची भेट घेवून जादुटोणा विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली़