दृष्टीहिन डॉक्टराने नाडी परिक्षणाने केली रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 01:36 PM2019-11-30T13:36:38+5:302019-11-30T13:36:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सामाजिक बांधिलकी जपत श्रीरामदूत सुंदरकांड सत्संग मंडळातर्फे सर्वरोग निदान शिबीर घेण्यात आले. यात सटाणा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सामाजिक बांधिलकी जपत श्रीरामदूत सुंदरकांड सत्संग मंडळातर्फे सर्वरोग निदान शिबीर घेण्यात आले. यात सटाणा येथील जन्मत:च दृष्टीहिन असलेले डॉ. के. पी. दुबे यांनी रुग्णांची नाडी परिक्षणाने तपासणी केली.
यावेळी जीवन कला मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील, कमलाकर बागुल व गोविंद माहेश्वरी आदी उपस्थित होते. डॉ.दुबे यांनी रुग्णांची तपासणी करीत त्या-त्या आजारांबाबत रुग्णांना मार्गदर्शन देखील केले. तर निसर्गाची सृष्टी पाहण्यासाठी डोळस नसलो तरी ज्ञानाची दृष्टी महत्त्वाची आहे. असे आत्मविश्वासाने सांगत जन्मत:च अंध असलेले सटाणा येथील एक्युप्रेशर तज्ञ डॉ. के. पी. दुबे यांच्या अनोख्या नाडी तपासणी पद्धतीमुळे असंख्य रुग्णांना लाभ झाला. अनेक रग्णांच्या आजाराचे अचुक निदान करीत त्यांच्या आजाराबाबत मार्गदर्शन देखील केले.