Vidhan Sabha 2019: मतांच्या विभाजनावर विजयाचे गणित अवलंबून राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:39 PM2019-10-18T12:39:08+5:302019-10-18T13:13:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर येथे यंदा तिरंगी लढत आहे. माजी आमदारांच्या अपक्ष उमेदवारीमुळे होणारे मतांचे विभाजन कुणाच्या पथ्यावर  ...

Voting message delivered by human chain | Vidhan Sabha 2019: मतांच्या विभाजनावर विजयाचे गणित अवलंबून राहणार

Vidhan Sabha 2019: मतांच्या विभाजनावर विजयाचे गणित अवलंबून राहणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर येथे यंदा तिरंगी लढत आहे. माजी आमदारांच्या अपक्ष उमेदवारीमुळे होणारे मतांचे विभाजन कुणाच्या पथ्यावर  पडते यावर निवडणूक निकाल अवलंबून राहण्याची शक्यता दिसून येत आहे.
नवापूर विधानसभा मतदारसंघ कॉँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. ज्येष्ठ नेते आमदार सुरूपसिंग नाईक यांच्या नावाने ओळखला जाणारा हा मतदारसंघ. सन 2009 च्या सार्वत्रिक निवडणूक निकालाचा अपवाद वगळता सन 1972 पासून आमदार सुरूपसिंग नाईक यांची मतदारसंघावर एकहाती सत्ता राहिली आहे. सन 2014 व सन 2019 च्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही या मतदारसंघात कॉँग्रेस पक्षच वरचढ ठरला आहे. 
यंदा आमदार सुरूपसिंग नाईक यांनी निवडणुकीत उमेदवार म्हणून आपला सहभाग न नोंदविता आपले पूत्र व आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत माणिकराव गावीत हे रिंगणात आहेत. 
शिरीष नाईक, भरत गावीत व भारतीय ट्रायबल पार्टीचे डॉ. उल्हास वसावे आपले भाग्य प्रथमच आजमावित आहेत. एक टर्म आमदार व दोन पंचवार्षिक उमेदवारीचा अनुभव असलेले माजी आमदार शरद गावीत तिस:यांदा उमेदवारी करीत आहे. यंदा ते अपक्ष लढत देत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक दहा उमेदवार नवापूर मतदार संघात आहेत. 
गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. त्यामुळे मतांचे विभाजन मोठय़ा प्रमाणावर झाले होते. यंदा कॉँग्रेस राष्ट्रवादी कॉँग्रेसची आघाडी व भाजप -शिवसेना अशी युती झाली आहे. नवापुरात ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत यांचा संपर्क आणि त्यांना मानणारा गट ही भरत गावीत यांच्या जमेची बाजू ठरली आहे. शिवाय भरत गावीत सातत्याने जिल्हा परिषद सदस्य, दोन पंचवार्षिक त्यांची प}ी संगीता गावीत जि.प. सदस्य राहिल्याने त्यांनी केलेल्या कामातून जनता त्यांच्याशी जुळली आहे. प्रचार कार्यात भाजपचे जुने कार्यकर्ते कुवरसिंग वळवीदेखील सक्रिय झाले आहेत. दुसरीकडे कॉँग्रेस उमेदवार शिरीष नाईक यांच्या प्रचारात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मोठे पदाधिकारी दिसून येत नसल्याचे चित्र आहे. 
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी व शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी अपक्ष उमेदवार शरद गावीत यांचा प्रचार करताना  दिसून येत आहे. तर भारतीय ट्रायबल पार्टीकडून उमेदवारी करीत असलेले डॉ. उल्हास वसावे आपली उमेदवारी मागे घेतील असा कयास लावला जात होता. मात्र त्यांनी उमेदवारी कायम ठेवली. त्यांना मिळणारी मते कुणाचे मत विभाजन करेल यावर प्रमुख उमेदवारांच्या यश -अपयशाचे गणित अवलंबून राहणार आहे.  निवडणूक रिंगणात आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी व पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पक्ष व संघटनांचे उमेदवार तथा अपक्ष  उमेदवारही रिंगणात असून ते देखील आपल्या यथाशक्ती प्रचार करीत आहेत. 

भाजपच्या प्रचाराचे मुद्दे 

शेती, सिंचन, रस्ते, आरोग्य या मूलभूत सुविधांना बळकटी देण्यात येणार.
राज्य व केंद्र शासनाच्या योजना सामान्य माणसार्पयत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रय} करणे.
नवापूर औद्योगिक वसाहतीत जास्तीत जास्त उद्योग आणण्यासाठी व डायमंड टेक्स्टाईल झोन अधिक विकसित करण्याचा प्रय}.
तरुणांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रय}.
नवापूर शहरातील पाणी समस्या कायमस्वरूपी सोडविणार.
उकई धरणातून महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी आणणार.
महिला सक्षमीकरणासाठी विविध आघाडय़ांवर प्रय} राहणार.

काँग्रेसच्या प्रचाराचे मुद्दे

विविध आजारांसाठी मल्टीस्पेश्ॉलिटी हॉस्पिटलची निर्मिती करणार.
रंगावली धरण ते नवापूर्पयत स्वतंत्र जलवाहिनी टाकून नवापूरचा पाणी प्रश्न सोडविणार.
तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी स्वतंत्र केंद्र.
विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी कागदपत्र उपलब्धतेसाठी मदत केंद्र उभारणार.
युवती व महिलांच्या स्व रक्षणासाठी मोफत प्रशिक्षणाची सोय करणार.

लढतीतील दहा उमेदवार व त्यांचे पक्ष 
भरत माणिकराव गावीत (भाजप), शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक (कॉग्रेस), शरद कृष्णराव गावीत (अपक्ष) उल्हास जयंत वसावे (भारतीय ट्रायबल पार्टी), जगन हुरजी गावीत (वंचित बहुजन आघाडी), रामू वळवी (पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया) सुनील गावीत (आम आदमी पार्टी), अजरुनसिंग वसावे (अपक्ष), प्रकाश गांगुर्डे (अपक्ष), डॉ. राकेश गावीत (अपक्ष).
 

Web Title: Voting message delivered by human chain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.