जिल्ह्यात 19 लाखाचा शेतसारा होणार माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:50 PM2018-11-22T12:50:35+5:302018-11-22T12:50:39+5:30
नंदुरबार : दुष्काळ असलेल्या जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील एक लाख 80 हजार शेतक:यांना जमीन महसूलातून सूट मिळणार आहे. साधारणत: 19 ...
नंदुरबार : दुष्काळ असलेल्या जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील एक लाख 80 हजार शेतक:यांना जमीन महसूलातून सूट मिळणार आहे. साधारणत: 19 लाख रुपयांचा शेतसारा यंदा माफ होणार आहे. या सवलतीत ग्रामपंचायत करांचा समावेश नाही. त्यामुळे दुष्काळात शेतक:यांना हा आर्थिक चटका मात्र सहन करावा लागणार आह़े
तळोदा, नंदुरबार, शहादा आणि नवापूर या तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने आणि पीक पैसेवारी देखील 50 पैशांपेक्षा कमी लावण्यात आल्यामुळे हे तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले आहेत. याशिवाय धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील काही मंडळांचा देखील दुष्काळी स्थितीत समावेश करण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर राज्यशासनाने या चार तालुक्यांना विविध सोयी सवलती प्रदान केल्या आहेत़ यात जमीन महसूलातून सुट देण्यात आली आह़े
महसूल विभागाकडून वार्षिक पद्धतीने आकारला जाणारा हा कर एक टक्क्यांपर्यत नाममात्र असल्याने चारही तालुक्यात थकबाकीदार शेतकरी नाहीत़ महसूल विभागाकडून 1930 पासून जमिनीचा पोत आणि दर्जा पाहून कर आकारण्याची पद्धत आजही कायम आहे. त्यामुळे शेतक:यांना महसूली कराबाबत जादाची रक्कम भरावी लागत नाही़
तळोदा तालुक्यात 12 हजार 160, नंदुरबार 53 हजार 459, नंदुरबार 63 हजार 427 तर नवापूर तालुक्यात 51 हजार 273 शेतकरी जमिन महसूल माफीच्या सवलतीस सध्या पात्र आहेत़
शेतक:यांकडून तळोदा तालुक्यात एक लाख 3 हजार, शहादा आठ लाख, नंदुरबार आठ लाख 28 हजार 900 तर नवापूर तालुक्यात 2 लाख रूपयांचा जमिन महसूल दरवर्षी भरण्यात येतो़
एकूण 19 लाख रुपयांच्या या कराला यंदाच्या वर्षापुरतीच सूट मिळणार असल्याने शेतक:यांना कराचा भरणा करावा लागणार नसल्याचे महसूल विभागाने म्हटले आह़े नंदुरबार तालुक्यातील 154 गाव हद्दीतील 61 हजार 40 हेक्टर, शहादा तालुक्याच्या 185 गाव हद्दीतील 60 हजार 646 हेक्टर, तळोदा तालुक्यातील 94 गावांच्या हद्दीतील 17 हजार 520 तर नवापूर तालुक्यातील 163 गावातील 57 हजार 625 हेक्टर शेतजमिन या महसूली करातून वगळली जाणार आह़े एकूण 1 लाख 96 हजार 831 हेक्टर हे क्षेत्र असल्याची माहिती आह़े यात वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आह़े महसूल विभागाकडून तहसीलदार आणि मंडळनिहाय आकडेवारी संकलन करण्याचे कार्य सध्या सुरु असल्याची माहिती देण्यात आली आह़े