वाघाळे शिवारात दारुबंदीसाठी सरसावल्या महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:43 PM2018-04-08T12:43:47+5:302018-04-08T12:43:47+5:30
वाघाळे : दारुसह सट्टयालाही केला विरोध, ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 8 : नंदुरबार तालुक्यातील वाघाळे येथे एकमताने दारु व सट्टा बंदीचा निर्णय घेण्यात आला़ या वेळी महिलांनी गावातील दारुचा साठा उद्ध्वस्त करुन सट्टयांच्या कागदांची राखरांगोळी केली़ यापुढे गावात दारु व सट्टा बंदीचा आदर्श उभा केला़ यापुढे गावात किंवा गावाच्या लगत दारु विकणा:यास व सट्टा चालवणा:यांवर कारवाई करुन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यवा अशीही मागणी करण्यात आली़
वाघाळे गावाला अनेक वर्षापासून दारु व सट्टयाची किड लागलेली होती़ या विरोधात गावातील युवावर्ग, सरपंच, पालीस पाटील, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आदींनी महिलांच्या नेतृत्वाखाली दारु व सट्टयांची तळे उद्ध्वस्त केली़ दारुच्या वाढत्या व्यसनामुळे गावातील तरुणाई दारुला बळी पडत होती़ त्यामुळे गावातील ग्रामस्थांचे आयुष्य धोक्यात आले होत़े गेल्या चार-पाच वर्षामध्ये दारुच्या व्यसनामुळे अनेकांचा दुदैवी मृत्यूही झाले आहेत़ तारुण्यात पदार्पण करणारी मुलही दारुच्या मोहात अडकत होती़ गावातील नवीन पिढी व्यसनापासून दुर रहावी, गावाचे भविष्य उज्वल रहावे परिणामी गावाची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेत गावात दारुबंदीचा निर्णय घेत प्रत्यक्षात कृतीदेखील केली़
ग्रामसभेत केला ठराव
वाघाळे गावाला वाळवी किडप्रमाणे पोखरणा:या दारुचा व सट्टयाचा बंदोबस्त करण्यासाठी वाघाळे ग्रुप ग्रामपंचायतने 2 एप्रिल रोजी ग्रामसभा आयोजीत करुन सभेत दारु व सट्टा बंदीचा ठराव मंजूर केला़ त्याच दिवशी सायंकाळी लाऊडस्पीकरच्या माध्यमातून गावभर दारु व सट्टा बंदीच्या सूचना दिल्या़
दुस:या दिवशी 3 एप्रिल रोजी सायंकाळी ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा सभा आयोजीत करुन सट्टा व दारुच्या अड्डयांवर हल्लाबोल करण्याचे नियोजन करण्यात आल़े सभा संपल्यानंतर गावातील महिलावर्गाच नेतृत्वाखाली तरुणवर्ग आणि जेष्ठ नागरिक ढोल ताशांच्या गजरात नाचत दारु बंद करण्याचे घोषणा देऊ लागल्या़ त्याच प्रमाणे दारु विक्रेत्यांच्या घरी जाऊन घरातील दारुच्या बाटल्या बाहेर काढून त्या उध्वस्त केल्या़ दारुची भांडीही फोडलीत़ सट्टयांच्या दुकानांमधील कागदे फाडून त्यांची होळी करण्यात आली़ यापुढे दारु विकणा:यास व सट्टा चालविण्या:यास कडक शासन होईल असाही इशारा या वेळी महिलांकडून देण्यात आला होता़ दरम्यान, दारु बंदीबाबत गावातील इतर ग्रामस्थांनीही सजग राहण्याचे आवाहन या वेळी महिलांकडून झाल़े भविष्यात इतरही गावांनी वाघाळे येथील ग्रामस्थांचा आदर्श घ्यावा अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली़