दोन आठवडे दमदार पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 05:33 PM2018-08-01T17:33:20+5:302018-08-01T17:33:26+5:30
कुलाबा वेधशाळा : ‘मान्सून ट्रफ’ हिमालयाजवळ स्थिरावल्याने परिणाम
नंदुरबार : ‘मान्सून ट्रफ’ म्हणजेच द्रोणीय वारे हिमालयाच्या पायथ्याशी स्थिरावले आहेत़ तसेच बंगालच्या उपसागरातसुध्दा कुठलाही कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला नसल्याने परिणामी उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात पावसाने उसंत घेतलेली आह़े विशेषकरुन उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन आठवडे तरी दमदार पावसाची सुतराम शक्यता नसल्याचे कुलाबा वेधशाळेच्या शास्त्रज्ञ डॉ़ शुभांगी भुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आह़े
नंदुरबारसह, जळगाव, धुळे आदी ठिकाणी आठवडाभरापासून पावसाने काहीशी उसंत घेतलेली आह़े विशेषत नंदुरबारात तर आतार्पयतच्या सर्वाधिक कमी पावसाची सरासरी 38.81 टक्के इतकी नोंद झालेली आह़े जिल्ह्यात सर्वाधिक कमी पावसाची नोंद नंदुरबार तालुक्यात करण्यात आली असून ती 30.44 टक्के इतकी आह़े नंदुरबारात दोन आठवडय़ांपूर्वी पावसाची रिपरिप सुरु होती़ त्यामुळे पिकांना नवसंजीवणी मिळाली होती़ परंतु साधारणत मागील आठवडय़ाचा संपूर्ण कालखंड कोरडाच गेला होता़
कोरडे दिवस वाढताय
जिल्ह्यात पावसाळ्यातील कोरडय़ा दिवसांच्या संख्येत वाढ होणे शेतक:यांसाठी चितेचा विषय ठरत आह़े मुसळधार पावसाअभावी नंदुरबार जिल्ह्यातील जलस्त्रोत अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत़ कुपनलिका, विहिर आदी कोरडय़ा आहेत़ त्यामुळे पुढील उन्हाळ्यार्पयत भिषण दुष्काळ पडण्याची अंदाज जाणकारांकडून वर्तविण्यात येत आह़े
मागील वर्षीच्या पावसाळ्यात 30 सप्टेंबर 2017 र्पयत झालेल्या पावसाची तालुका निहाय सरासरी व टक्केवारी बघता, नंदुरबार तालुका 594 मि़मी़ 92 टक्के, नवापूर 965 मि़मी़ 85.94 टक्के, शहादा 511 मि़मी़ 74़48 टक्के, तळोदा 711 मि़मी़ 92़2 टक्के, अक्कलकुवा 877 मि़मी 85़39 टक्के, अक्राणी 836 मि़मी 109.80 टक्के अशा प्रकारे मागील वर्षी एकूण सरासरी 89़61 टक्के पावसाची नोंद करण्यात आली होती़
तर यंदा 30 जुलैर्पयतची पावसाची आकडेवारी बघितली असता, नंदुरबार तालुक्यात आतार्पयत एकूण 196.30 मि़मी व 30.44 टक्के पावसाची नोंद झालेली आह़े तसेच नवापूर 365 मि़मी़ व 32.51 टक्के, शहादा 266 मि़मी़ व 38.77 टक्के, तळोदा 319 मि़मी़ व 41.28 टक्के, अक्कलकुवा 407 मि़मी़ 51.62 टक्के, अक्राणी 393 मि़मी व 39.63 टक्के अशा प्रकारे आतार्पयत सरासरी 324.38 मि़मी व 38.81 टक्के पावसाची नोंद झालेली आह़े
कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे गरजेचे
चांगल्या पजर्न्यमानासाठी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे महत्वाचे ठरत असत़े परंतु सध्या उपसागरात कुठल्याही प्रकारचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला नाही़ त्यामुळे साहजिकच याचा परिणाम पजर्न्यमानावर होत असतो़ सध्या तरी दोन आठवडय़ांर्पयत पावसाने विश्रांती घेतली असल्याचे मत हवामानतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आह़े परंतु त्यानंतरची पावसाची स्थिती ही वेळेवर निर्माण होणा:या भौगोलिक स्थितीवर अवलंबून राहणार असल्याचेही सांगण्यात आले आह़े महाराष्ट्राच्या पजर्न्यमानासाठी द्रोणीय वा:यांची स्थिती फार महत्वाची असत़े सध्या ‘मान्सून ट्रफ’ म्हणजेच द्रोणीय वारे हिमालयाया पायथ्याशी घोंगावत आहेत़ त्यामुळे त्याचा परिणाम पजर्न्यमानावर होत आह़े असे असले तरी, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस नसला तरी, हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस संभवतो़ अशा पावसामुळे जलस्त्रोतांवर याचा फारसा परिणाम होणार नसला तरी, पिकांवर याचा सकारात्मक परिणाम होणे अपेक्षीत आह़े
चक्रीवादळाचा धोका नाही
सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे नाहीत तसेच अद्यापतरी कुठल्याही चक्रीवादळाचा धोका नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेले आह़े चक्रीवादळामुळे पजर्न्यमानास धोका निर्माण होत असतो़ त्यामुळे सध्या तरी असा कुठलाही धोका नसल्याचे सांगण्यात आले आह़े
उत्तर-पूर्व भागात काही प्रमाणात ‘मान्सून ट्रफ’चा भाग आच्छादला आह़े त्यामुळे येत्या काही दिवसात याची वाटचाल दक्षिणेकडे होऊन याव्दारे मान्सून परतण्यास मदत होणार असल्याचे भाकित शास्त्रज्ञांकडून करण्यात येत आह़े तरी या सर्व प्रक्रियेस दोन आठवडय़ांचा काळ लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े नंदुरबारसह खान्देशात दमदार पाऊस व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े