महत्वाकांक्षी ‘सौभाग्य’ योजनेची लाभाथ्र्याना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 11:10 AM2018-12-08T11:10:44+5:302018-12-08T11:10:49+5:30

योजनेला गती द्यावी : शहादा वीज वितरण कंपनीची स्थिती

Waiting for the ambitious 'good luck' scheme | महत्वाकांक्षी ‘सौभाग्य’ योजनेची लाभाथ्र्याना प्रतीक्षा

महत्वाकांक्षी ‘सौभाग्य’ योजनेची लाभाथ्र्याना प्रतीक्षा

Next

बोरद : केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या ‘हर घर बिजली (सौभाग्य) योजने’ची जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अद्याप प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आह़े योजनेच्या व्याप्तीसाठी अंमलबजावणीची गती वाढविण्यात यावी व याचा लाभ वीज ग्राहकांना मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून ‘पंतप्रधान सहज हर घर बिजली योजना’ म्हणजेच सौभाग्य योजना राबविण्यात येत आह़े या माध्यमातून ज्या गाव-पाडय़ांमध्ये अद्याप वीज पोहचली नाही, अशा ठिकाणी युध्द पातळीवर वीज खांब बसविणे, गावा-गावात वीज पोहचवणे आदी कामे वीज वितरण कंपनीकडून करण्यात येत आह़े शहादा विभागातील चार तालुक्यांमध्ये या योजनेंतर्गत तब्बल 60 कोटी रुपयांची कामेदेखील हाती घेण्यात आलेली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आह़े परंतु अद्याप याबाबत पाहिजे त्या गतीने कार्यवाही होत नसल्याने वीज जोडणीची कामेही संथ होत असल्याची माहिती समोर येत आह़े शहादा विभागांतर्गत 60 कोटींच्या कामांचा शुभारंभ होऊन 23 हजार 479 घरगुती वीज कनेक्शन देण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून करण्यात येत असल्याची माहिती आह़े या बाबत शहादा विभागाचे कार्यकारी अभियंता क़ेडी़ पावरा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, धडगाव तालुक्यात 8 हजार 435, तळोदा तालुक्यात 4 हजार 227, शहादा तालुक्यात 4 हजार 324 तर अक्कलकुवा तालुक्यात 6 हजार 493 ग्राहक असे मिळून 23 हजार 479 ग्राहकांच्या घरगुती वीज जोडणीची कामे प्रगती पथावर आह़े
तारांऐवजी ए़बी़ केबल
शहादा विभागांतर्गत चारही तालुक्यांमध्ये वीज जोडणीची कामे करण्यात येत असल्याचा दावा विद्युत वितरण कंपनीकडून करण्यात येत आह़े यांतर्गत चारही तालुक्यांमध्ये वीज खांब टाकून त्याव्दारे वीज जोडणीची कामे करण्यात येत आह़े दरम्यान, नवीन वीज खांबावर वीज तारांऐवजी ए़बी़केबलचा वापर करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली़ 
दरम्यान, अजून सुमारे 15 हजार वीज जोडणीची कामे करायची बाकी  असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली़ त्यामुळे साहजिकच संपूर्ण जिल्ह्यात योजनेला गती देण्याची आवश्यकता असल्याचे मत वीज ग्राहकांकडून व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, ग्रामीण, दुर्गम भागात मोठय़ा प्रमाणात वीज चोरीच्या घटना घडत आहेत़ संपूर्ण गावे आकडीमुक्त करण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीकडून घेण्यात आला आह़े परंतु महत्वाकांक्षी योजनांना गती मिळत नसल्याने आकडीमुक्त गावाचे स्वप्न पूर्ण होणार कसे? असा प्रश्न आता विचारण्यात येत आह़े 
दारिद्रय रेषेखालील कुटुंबियांना वीज जोडणीमध्ये सवलत मिळत आह़े परंतु जिल्ह्यातील बहुतेक ग्रामीण भागात योजनेची अद्याप सुरुवातदेखील करण्यात आली नसल्याने प्रशासनाने कामाची गती वाढविणे गरजेचे आह़े
 

Web Title: Waiting for the ambitious 'good luck' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.