नवीन वसतिगृहात स्थलांतराची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:47 AM2018-12-25T11:47:40+5:302018-12-25T11:47:44+5:30

चिंचपाडा : भाडय़ाच्या इमारतीत विद्यार्थिनींचे वास्तव्य, वसतिगृह बांधून तयार

Waiting for the migration to the new hostel | नवीन वसतिगृहात स्थलांतराची प्रतीक्षा

नवीन वसतिगृहात स्थलांतराची प्रतीक्षा

Next

चिंचपाडा : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थिनींसाठी नवीन वसतिगृह उभारण्यात आले आह़े परंतु या ठिकाणी रोहित्र तसेच संरक्षक ¨भंतीची व्यवस्था    नसल्याने ते निरुपयोगी ठरत आह़े त्यामुळे संबंधित विद्यार्थिनींना नवीन वसतिगृहात स्थलांतर करण्यासाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागत आह़े 
तात्पुरत्या स्वरुपावर आदिवासी विकास विभागाकडून चिंचपाडा येथे स्टेशन वार्ड क्रमांक 5 मध्ये भाडेतत्वावर इमारत घेतली असून त्यात सुमारे 70 विद्यार्थिनींची राहण्यासाठी सोय केली आह़े                  परंतु तेथेसुध्दा विद्यार्थिनींना  आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होऊ शकत  नाहीत़ त्यामुळे प्रशासनाने नवीन वसतिगृहात सर्व सोयी           उपलब्ध            करुन विद्यार्थिनींसाठी वसतिगृह कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली             आह़े 
दरम्यान, नव्या वसतिगृहामध्ये विद्युत रोहित्र, संरक्षण भिंत आदी कामे बाकी आहेत़ याची कार्यवाही सुरु असून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी होत आह़े नवीन वसतिगृहामध्ये सुमारे 250 विद्यार्थिनी राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आह़े आदिवासी विद्याथ्र्याची सोय व्हावी म्हणून शासनाकडून वसतिगृह उभारुन  त्या ठिकाणी विद्याथ्र्यावरील आर्थिक भार हलका करण्यात येत असतो़ परंतु वसतिगृहांचे ब:यापैकी काम संथ गतीने सुरु असल्याने याकडे आदिवासी विकास विभागाने लक्ष देऊन त्वरीत कामे मार्गी लावण्याची मागणी करण्यात येत आह़े शासनाने भाडेतत्वावर इमारत घेऊन त्यात विद्यार्थिनींची व्यवस्था केली आह़े परंतु त्यातही पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा नसल्याने या ठिकाणी विद्यार्थिनींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े 

Web Title: Waiting for the migration to the new hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.