दोन महिन्यांपासून वीज मीटरची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:46 PM2018-03-09T12:46:13+5:302018-03-09T12:46:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवीन वीज कनेक्शनसाठी डिमांडची रक्कम भरूनही शहादा आणि नंदुरबार विभागात सुमारे अडीच हजार घरगुती आणि कृषीपंपधारकांना वीज मीटर उपलब्ध झाले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े नंदुरबार जिल्ह्यात अडीच हजार मीटरची मागणी अभियंत्यांनी वील कंपनीच्या वरिष्ठांकडे केली आह़े
शहादा विभागातील तळोदा, धडगाव, अक्कलकुवा आणि शहादा या चार तर नंदुरबार विभागातील नंदुरबार आणि नवापूर या तालुक्यात नव्याने जोडणी करण्यासाठी दर दिवशी किमान 10 घरगुती आणि 50 शेतकरी अर्ज करत आहेत़ रब्बी हंगामात पाण्याची गरज असल्याने शेतकरी नवीन जोडणीसाठी प्रयत्न करत होत़े मात्र वीज वितरण कंपनीत डिमांड भरून 2 महिने उलटूनही नवीन जोडणी मिळालेली नाही़ दोन्ही विभागात देण्यात येणारे वीज मिटरच नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आह़े शहादा विभागात 635 तर नंदुरबार विभागात 231 गावे समाविष्ट करण्यात आली आह़े यात कृषी पंप आणि घरगुती अशा दोन प्रकारात वीज जोडण्यात देण्यात आल्या आहेत़ नंदुरबार विभागात कृषी पंपाच्या सहा हजार 700 तर 10 हजार 500 घरगुती जोडण्या आहेत़ या सर्वाना वीज मीटर देण्यात येऊन त्यांच्याकडून मासिक पद्धतीने वीज बिलांची जोडणी करण्यात येत़े गेल्या दोन महिन्यांपूर्वी नंदुरबार तालुक्यातील ग्रामीण भागातून 74 घरगुती आणि 204 कृषीपंपांच्या जोडण्यांसाठी नागरिकांनी अर्ज केले आहेत़ हे सर्व अर्ज गेल्या दोन महिन्यांपासून प्रलंबित आहेत़ त्यावर कारवाई करण्यात येत नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांची फिरफिर होत आह़े तालुक्यातील 104 गावांमधून करण्यात आलेल्या अर्जाची पूर्तता होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आह़े वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागात एकूण 22 हजार 669 कृषीपंपांचे कनेक्शन आहेत़ तर 1 लाख 65 हजार 275 घरगुती वीज कनेक्शन आहेत़ ग्रामीण आणि शहरी भागाचा समावेश असलेल्या शहादा विभागात तब्बल 635 गावांचा समावेश आह़े नंदुरबार विभागाच्या तुलनेत घरगुती ही संख्या अधिक असून या विभागाची वार्षिक वसुलीही नंदुरबार विभागापेक्षा अधिक आह़े शहादा विभागात यंदा नव्याने वीज जोडणीसाठी 500 घरगुती आणि 2 हजार 200 कृषीपंपांच्या जोडणीसाठी अर्ज करण्यात आले आहेत़ दोन महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या या अर्जावर कारवाई व्हावी म्हणून शेतकरी वेळावेळी भेटी देऊन माहिती घेत आहेत़ शहादा तालुक्यात दरवर्षी बागायती क्षेत्र वाढत आह़े यासाठी शेतकरी कूपनलिका घेत लगेच वीज कनेक्शनासाठी कंपनीकडे अर्ज करतात़ शेतात लावण्यात आलेल्या मोटारीच्या अश्वशक्तीनुसार डिमांडची रक्कम ठरवण्यात येत़े शेतकरी क्षेत्रानुसार मोटारी खरेदी करत असल्याने त्यांच्याकडून ही रक्कम वेळेपूर्वी भरण्यात येत़े यंदा किमान 700 पेक्षा अधिक शेतक:यांना वीजेची प्रतिक्षा आह़े या शेतक:यांना कंपनीकडे वीज मीटर उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी केलेल्या अर्जाच्या ज्येष्ठतेनुसार मीटर देण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आह़े नवीन वीजमीटरसाठी असलेला तिढा सोडवण्यासाठी जळगाव परिमंडळाच्या अधिका:यांकडून सातत्याने राज्यस्तरावर पाठपुरावा करण्यात येत होता़ यानुसार गुरूवारी सायंकाळी वीज कंपनीच्या नंदुरबार विभागाला 2 हजार 749 मीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत़ यातून येत्या काळात प्रलंबित आणि रांगेत असलेल्या अजर्दारांना मीटर देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आह़े
महावितरणच्या जळगांव परिमंडळात नवीन वीजोडणीकरीता पुरेसे वीजमीटर उपलब्ध असल्याची माहिती वीज कंपनीने दिली आह़े या पाश्र्वभूमीवर कंपनीच्या अभियंत्यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निधर्ाीत केलेल्या कृती मानकांचे पालन करून ग्राहकांना मागणी अर्जाप्रमाणे जेष्ठतेनुसार विहीत मुदतीत नवीन वीजजोडणी देण्याचे आदेश काढले गेले आहेत़ अन्यथा संबंधीत अभियंत्याचे वेतनातून दंड स्वरूपात ग्राहक भरपाई कपात करण्याचे निर्देश मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी दिले आहेत.