नंदुरबारमध्ये जळीत रूग्णांना उपचार कक्षाची प्रतिक्षा
By admin | Published: June 20, 2017 12:53 PM2017-06-20T12:53:37+5:302017-06-20T12:53:37+5:30
एकाच खोलीत होतात उपचार : सहा महिन्यात नऊ महिलांचा मृत्यू
Next
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.20 : जिल्ह्यातील विविध भागातून येणा:या जळीत रूग्णांसाठी नवीन वार्डाच्या उभारणी काम सामान्य रूग्णालयात अद्यापही सुरू आह़े आता हे काम अंतिम टप्प्यात आले असले, तरीही दर दिवशी दाखल होणा:या जळीत रूग्णांचे उपचारांअभावी हाल होत होत असून सहा महिन्यात नऊ महिलांचा मृत्यू झाला आह़े
विस्तारीकरणाच्या प्रक्रियेतील जिल्हा रूग्णालयात अनेक सुविधांची प्रतिक्षा आह़े गेल्या 17 वर्षात जळीत रूग्णांसाठी निर्माण करण्यात आलेल्या वार्डाच्या नावावर एक खोली देऊन उपचार करण्याची पद्धत प्रशासनाने अंगीकारली आह़े या कक्षात तापमान नियंत्रण न करता, ऑक्सिजन आणि इतर सेवाविनाच देण्यात येणारे उपचार रुग्णांसाठी त्रासदायक ठरत आहेत. अद्यापही 15 दिवसात कक्ष पूर्ण होणार, अशी माहिती सामान्य रूग्णालय प्रशासन करत असल्याने जळीत रूग्णांबाबत चिंता कायम आहेत़
नंदुरबार जिल्हा सामान्य रूग्णालयात जानेवारी ते जून 2017 या काळात नऊ जळीत महिलांचा मृत्यू झाला आह़े जानेवारी महिन्यात याठिकाणी सात, फेब्रुवारी महिन्यात 10, मार्च महिन्यात दोन, एप्रिल महिन्यात चार, मे महिन्यात सहा आणि जून महिन्यात दोन अशा एकूण 31 जळीत महिलांना दाखल करण्यात आले होत़े
मयत झालेल्या सहापैकी प्रत्येकीची जळीताची टक्केवारी ही 47 ते 98 या दरम्यान होती़ तर इतर 25 महिला ह्या 83 टक्क्यांर्पयत जळाल्याची माहिती देण्यात आली आह़े
जिल्हा रूग्णालयात जळीतांसाठी स्वतंत्र वार्डाची समस्या आजही कायम आह़े रूग्णालयाच्या विस्तारीत नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आह़े या बांधकामात 20 खाटांचा एक कक्ष देण्यात आला आह़े याठिकाणी अद्यापही एसी बसवण्याचे काम पूर्ण झालेले नसल्याने अजूनही 15 दिवस रूग्णांना वाट पहावी लागणार आह़े