७० वर्षांपासून ग्रामस्थांना ‘केवळ’ रस्त्याची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 12:16 PM2019-12-09T12:16:14+5:302019-12-09T12:16:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : तालुक्याच्या दुर्गम भागात स्थित चिखलीचा आमखेडीपाडा या अतीदुर्गम भागात सुविधांचा अभाव आहे़ देशाला स्वातंत्र्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : तालुक्याच्या दुर्गम भागात स्थित चिखलीचा आमखेडीपाडा या अतीदुर्गम भागात सुविधांचा अभाव आहे़ देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष पूर्ण होऊन अंधकामय असलेल्या या पाड्यात उजेड देण्याचे काम तेथील भूमिपूत्रांनी घेतले असून शिक्षण घेतलेले हे नवे शिलेदार शासनदरबारी समस्यांची उजळणी करुन पाठपुरावा करत आहेत़
धडगाव तालुक्याच्या उत्तरेला बिलगाव परिसरात चिखली हे गाव आहे़ तेथून ९ किलोमीटर अंतरावर आमखेडीपाडा अंतरावर आहे़ डोंगर आणि वनाने वेढलेल्या आमखेडीपाडा येथे ४०० नागरिकांची वस्ती आहे़ सातपुड्यातील पाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्याचीही सोय नाही़ पाटीलपाडा येथून आमखेडीपाडा येथे जाणाऱ्यांना नेहमीच संकटांचा सामना करावा लागतो़ पाड्यापर्यंत पक्का रस्ता झाल्यास या सर्व समस्यांवर मात करता येणे शक्य असल्याने येथील शिक्षित युवकांनी पुढे शासनाकडे दाद मागणे सुरु केले आहे़ या युवकांनी पुढाकार घेत नुकतीच जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांची भेट घेत त्यांना निवेदन देऊन अडचणी मांडल्या होत्या त्यावर कारवाई कधी होणार याची अद्याप खात्री नसली तरी कारवाई होणार अशी अपेक्षा आहे़
गावातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली रस्त्याची समस्या निकाली काढली जावी यासाठी, येथील युवक पुढे आले असून त्यांच्याकडून शासनस्तरावर पाठपुरावा सुरु झाला आहे़ दैनंदिन अडचणींवर मात करत गेल्या १५ वर्षात धडगावपर्यंत जाऊन शिक्षण घेत पुढे आलेल्या या युवकांनी गाव-पाड्याच्या विकासासाठी नेमके काय, करता येईल याची चर्चा करुन पाठपुरावा सुरु केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले़ जिल्हाधिकारी यांची भेट घेतल्यानंतर त्यांना रस्ता ही एकमेव महत्त्वपूर्ण समस्या असल्याचे पटवून देण्यात आले़ येथे रस्ता निर्मिती झाल्यानंतर प्रशासना हातपंप, कूपनलिका, शेतीविषयक मार्गदर्शन कार्यशाळा, बालविकास प्रकल्पांतर्गत उपक्रम घेता येतील अशी अपेक्षा या युवकांकडून व्यक्त करण्यात आली आहे़
रस्ता नसल्याने येथील उपचारासाठी धडगावपर्यंत जाणाºया गर्भवती माता, रुग्ण, महिला, वृद्ध यांची आबाळ होत आहे़ गावात पिण्याच्या पाण्याचा कोणताही कृत्रिम स्त्रोत नाही़ अनेक वर्षांपासून हीच स्थिती असली तरी या गावासाठी आजवर विकासकामेच मंजूर नसावीत, का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे़ प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देत चौकशी करण्याची मागणी आहे़
आमखेडीपाडा येथील धनसिंग लेहºया पावरा, मेयसिंग एल पावरा, प्रकाश पावरा, दारासिंग पावरा, राकेश पावरा, दिनेश पावरा या युवकांनी हे निवेदन दिले आहे़
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पाटीलपाडा ते आमखेडीपाडा रस्ता झाल्यास विद्यार्थ्यांचीही सोय होईल़