कजर्दारांना माफी आणि बिगर कजर्दारांना पैसे देण्याची कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 12:26 PM2019-12-03T12:26:37+5:302019-12-03T12:26:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विविध बँकांकडून कर्ज घेणा:या शेतक:यांना कजर्माफी तर बिगर कजर्दार शेतक:यांना पैसे देण्याची नव्या सरकारची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विविध बँकांकडून कर्ज घेणा:या शेतक:यांना कजर्माफी तर बिगर कजर्दार शेतक:यांना पैसे देण्याची नव्या सरकारची योजना आह़े यासाठी जिल्हास्तरावर शेतक:यांच्या याद्या तयार करण्याचे काम हाती घेतले गेले असून नंदुरबार कृषी विभागात या संदर्भात कामकाज सोमवारपासून सुरु करण्यात आले आह़े या याद्या आठवडाभरात पूर्ण करण्यात येणार आहेत़
राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कामे सुरु करण्यात आल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली आह़े याअंतर्गत जिल्ह्यातील 13 हजार शेतक:यांचे 189 कोटी रुपयांचे पीककर्ज माफ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े यात 5 हजार बिगर कजर्दारांचाही समावेश होणार असून त्यांना रोख रक्कम देण्यात येणार आह़े
जिल्ह्यातील 13 हजार 486 शेतक:यांनी 189 कोटी 89 लाख रुपयांचे कर्ज जिल्हा बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतले आह़े जिल्हा बँकेने 5 हजार 481 सभासदांना 42 कोटी 70 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आह़े राष्ट्रीयकृत बँकांनी 5 हजार 189 सभासदांना 90 कोटी 42 लाख रुपयांचे तर खाजगी आणि ग्रामीण बँकांनी मिळून 1 हजार 411 शेतक:यांना 34 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याची माहिती आह़े या सर्व शेतक:यांचे कर्ज माफ करण्यापूर्वी त्यांच्या नावांची पडताळणी व्हावी यासाठी कृषी आयुक्तालयाने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला दिलेल्या आदेशानुसार शेतक:यांच्या याद्या मागवण्यात येत आहेत़ अद्याप ही योजना गुलदस्त्यात असली तरी कजर्दारांना कर्ज माफ आणि बिगर कजर्दारांना रक्कम अशीच सोय करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून खात्रीशीरपणे सांगण्यात आले आह़े जिल्ह्यातील बिगर कजर्दार शेतक:यांची संख्या समजण्यासाठी बँकांकडून कर्ज न घेता विमा घेणा:या शेतक:यांची नावे पडताळण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े जिल्ह्यात 5 हजार 386 शेतकरी बिगर कजर्दार शेतकरी आहेत़ या शेतक:यांना मदत नेमकी कधी मिळणार हे मात्र कळालेले नाही़