जागेअभावी रखडल्या अंगणवाडी इमारती

By admin | Published: January 22, 2017 12:11 AM2017-01-22T00:11:56+5:302017-01-22T00:11:56+5:30

नंदुरबार : जिल्ह्यातील 400 अंगणवाडी इमारतीविना आहेत. त्यापैकी 140 अंगणवाडी केंद्रांसाठी निधीची मागणी करण्यात आलेली आली

Wandered anganwadi buildings without awakening | जागेअभावी रखडल्या अंगणवाडी इमारती

जागेअभावी रखडल्या अंगणवाडी इमारती

Next

नंदुरबार : जिल्ह्यातील 400 अंगणवाडी इमारतीविना आहेत. त्यापैकी 140 अंगणवाडी केंद्रांसाठी निधीची मागणी करण्यात आलेली आली असून 150 अंगणवाडींचे काम  जागा किंवा इतर भौगोलिक परिस्थितीमुळे होऊ शकत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अजूनही अनेक अंगणवाडी या झोपडीत किंवा कुडाच्या घरात भरत आहेत.
जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता अनेक गावांमध्ये अद्यापही अंगणवाडींच्या इमारत नाहीत. अंगणवाडी ही गावाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र मानले जाते. जिल्ह्यात 12 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 2364 नियमित व 70 मिनी असे एकूण 2434 अंगणवाडी मंजूर आहेत. त्यापैकी 1571 अंगणवाडय़ांना स्वत:च्या इमारती आहेत. उर्वरित 863 अंगणवाडींपैकी 370 अंगणवाडी केंद्राची कामे विविध योजनेत प्रस्तावीत आहेत. जवळपास 400 अंगणवाडींना स्वत:ची इमारत नाही.
इमारत नसल्याने झोपडीत
दुर्गम भागातील अनेक  अंगणवाडींना इमारत नसल्याने त्या झोपडीत सुरू आहेत. काही तर उघडय़ावर भरवल्या जातात. त्यामुळे पोषण आहार देणे, शिजवणे, बालकांचे वजन घेणे यासह इतर   कामे उघडय़ावरच करावी लागतात. त्यामुळे अशा अंगणवाडींना तातडीने इमारती उभ्या कराव्या अशी मागणी आहे. परंतु भौगोलिक परिस्थिती  आणि जागेची अडचण यामुळे ब:याच भागात इमारती उभ्या राहू शकत नाहीत.
115 ठिकाणी मिळणार इमारत
2014-15 मध्ये आदिवासी उपयोजनेंतर्गत 115 अंगणवाडी केंद्राचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून गट विकास अधिकारी अक्कलकुवा, नवापूर, धडगाव यांना निधी वितरित करण्यात आलेला आहे. ती कामे जवळपास पूर्ण करण्यात आली  आहेत. 186 अंगणवाडी केंद्राचे बांधकाम करण्यासाठी 2012-13 मध्ये फायबरशिटपासून अंगणवाडी बांधकाम योजना प्रस्तावित करण्यात आली होती. त्याअंतर्गत धडगाव, नवापूर, शहादा, नंदुरबार व अक्कलकुवा येथे अंगणवाडी बांधकाम योजना प्रस्तावीत करण्यात आलेली होती. परंतु बांधकाम विभागाने काढलेल्या ई-निविदेला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे  186 अंगणवाडी केंद्राच्या कामाची प्रशासकीय मान्यता आदेश रद्द करण्यात येऊन त्या योजनेंतर्गत  निधी परत पाठविण्यात आला होता.
भौगोलिक परिस्थितीचा अडसर
अनेक भागात भौगोलिक परिस्थितीचा अडसर येत आहे. आदिवासी उपयोजनेंतर्गत यापूर्वी 192 अंगणवाडी केंद्रांचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा कार्यालयाकडून गटस्तरावर निधी वितरीत करण्यात आलेला होता. जागेअभावी व भौगोलिक परिस्थितीमुळे तोरणमाळचा खालील भाग, नर्मदा काठावरील गावांचा भागात खर्च वाढल्यामुळे ती कामे त्या त्या वर्षात सुरू झालेली नव्हती.

व्याप वाढला, परंतु इमारतींचा अभाव
अंगणवाडींचा व्याप सध्या मोठय़ा प्रमाणावर वाढविण्यात आला आहे. पोषण आहार देणे, आरोग्यदृष्टय़ा मुलांची, गरोदर मातांची काळजी घेणे, अमृत आहार योजना राबविणे यासह इतर विविध उपक्रमांमध्ये देखील अंगणवाडी सेविकांना काम करावे लागते. त्यात अनेक ठिकाणी इमारती नसल्यामुळे असे दप्तर व कागदपत्रे नाईलाजाने सेविकांच्या घरी ठेवावे लागते.
जिल्ह्यातील अनेक अंगणवाडी केंद्र ही समाजमंदिर, जिल्हा परिषद शाळेची खोली, ग्रामपंचायत इमारत, अंगणवाडी सेविकेच्या घरी भरवली किंवा चालविली जातात. असे असतांनाही स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा संबंधित आपल्या गावाला अंगणवाडी इमारत उभी राहावी यासाठी प्रय} करतांना दिसत नसल्याचेही चित्र आहे.

Web Title: Wandered anganwadi buildings without awakening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.