प्रभाग 17 मध्ये नळांना दूषित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:19 PM2019-07-10T12:19:16+5:302019-07-10T12:19:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील कोहिनूर टॉकिज परिसरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये नळांना दूषित पाणी येत असल्याने पालिकेने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील कोहिनूर टॉकिज परिसरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये नळांना दूषित पाणी येत असल्याने पालिकेने तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आह़े याबाबत त्यांच्याकडून पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आह़े
निवेदनात, कोहिनूर टॉकिज, साक्री नाका परिसरातील नागरिकांना दूषित व दरुगधीयुक्त पाणी पुरवठा होत आह़े पालिकेच्या पाईपलाईनजवळ ड्रेनेजलाईन आह़े त्यामुळे नळांना दूषित पाणी येत आह़े यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आह़े दूषित पाण्यामुळे डायरिया, ताप, खाज यासारखे आजार होऊन लहान मुलांना व आबालवृद्धांना बळावत आहेत़ यासंदर्भात 1 जुलै रोजी पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले होत़े पालिका प्रशासनाने तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आह़े निवेदनावर शरदचंद्र वासुदेव चौधरी, मोहन दिगंबर घरटे, फत्तू किशोर लोहार, भानुदास बाबुलाल लोहार, हेमंत सोनार, निळकंठ भगवान चौधरी, दिनेश वरसाळे, रामभाऊ वरसाळे, शरिफखाँ पठाण, भरत लोहार यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या सह्या आहेत़