वरखेडीचा पुल ठरतोय जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:19 PM2018-07-12T12:19:12+5:302018-07-12T12:19:18+5:30
अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्ग : पुलाच्या स्ट्ररल ऑडीटची मागणी
वाण्याविहीर : अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावरील अक्कलकुवा ते सोरापाडापासूनजवळच असलेल्या वरखेडी नदीवरील पुल जीवघेणा ठरू पाहात आहे. पहिल्याच पावसात वरखेडी येथील नदी पुलावर जीवघेणे खड्डे पडल्याने पुलाची दयनिय अवस्था झाली आहे. या महार्गावर वाहनाची नेहमीच वर्दळ असते.
रस्त्यात खड्डे की, खड्डयात रस्ता हेच वाहनचालकांना समजत नसल्याने खड्डे टाळण्याच्या प्रय}ात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गाने गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेश असे तीन राज्य जोडले गेले आहेत. गुजरात राज्यातून अवजड सामग्री महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शहरांमध्ये जात असल्याने अवजड वाहने रात्रंदिवस ये-जा करीत असतात. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा अधीक क्षमतेची वाहने या महार्गावरून जात असल्याने रस्ता लवकर खराब होतो. तसेच वरखेडी नदीवरील पुलाची दिवसेंदिवस दुरवस्था होत असून, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उपाय योजना करण्यात येत नाही. यासाठी लवकरात लवकर अंकलेश्वर-ब:हाणपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होणे गरजेचे आहे.
बारडोली, व्यारा, सोनगड व नवापूरकडून मध्यप्रदेशात जाणारी सर्व वाहने या मार्गाने जात असल्याने या मार्गावर नियमित वाहतुकीचा खोळंबा होतो.
सध्या हा राज्य मार्ग असल्याने या मार्गाची वाहतूक क्षमता नऊ ते 15 टन वजन वाहून नेण्याची आहे. मात्र या मार्गावरून 25 टनांची अवजड वाहने जात असल्याने सातत्याने हा मार्ग खराब होतो. या मार्गावरील वाहतूक ही राष्ट्रीय महामार्गाच्या बरोबरीची असल्याने सद्य:स्थितीतील रस्ता हा कमी पडत असल्याने या मार्गाचे लवकरात लवकर चौपदरीकरण करण्यात यावे जेणेकरून सर्व समस्या सुटू शकतील. त्यामुळे संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून वरखेडी नदीपुलाची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.