प्राथमिक शिक्षकांचा धरणे आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:22 AM2021-07-18T04:22:22+5:302021-07-18T04:22:22+5:30

अखिल नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघातर्फे प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लागाव्यात, यासाठी धरणे आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन ...

A warning of the bear movement of primary teachers | प्राथमिक शिक्षकांचा धरणे आंदोलनाचा इशारा

प्राथमिक शिक्षकांचा धरणे आंदोलनाचा इशारा

Next

अखिल नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघातर्फे प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लागाव्यात, यासाठी धरणे आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. मागण्यांमध्ये नियमितपणे पगार ५ तारखेच्या आत करण्यात यावा, पगारासाठी सीएमपी प्रणाली कार्यान्वित करावी, पात्र शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर करावी, सेवाज्येष्ठता सूची तयार व्हावी, वरिष्ठ वेतनश्रेणी पात्र शिक्षकांना मंजूर व्हावी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, पदोन्नती मुख्याध्यापक, विषय शिक्षक पदोन्नतीच्या जागा भराव्यात, दिव्यांगांचा पदोन्नती अनुशेष भरणे, डीसीपीएसधारकांची झालेली कपातीचा हिशेब मिळावा, स्वेच्छेने एनपीएस खाते उघडणाऱ्या शिक्षकांची खाते उघडण्यासाठी कार्यवाही करून कपात सुरू करावी, मागील सर्व भविष्य निर्वाह निधी हिशेब पावत्या त्वरित मिळाव्यात व नोंदी अद्ययावत कराव्यात, भविष्य निर्वाह निधी अग्रीम प्रकरणे, सेवानिवृत्तीधारकांची उपदाने, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची भविष्य निर्वाह निधी रक्कम वर्ग करणे ही कामे वेळीच पूर्ण व्हावीत, सातवा वेतन आयोग फरकाचा दुसरा हप्ता जमा करणे, सर्व शिक्षा अभियानअंतर्गत विविध बांधकामांचा शेवटचा हप्ता मिळावा, आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी सुरेश भावसार, भगवान पाटील, मोहन बिस्नारिया, अशोक देसले, संजय देवरे, संजय खैरणार, महेंद्र चौधरी, लोटन जगदाळे, विशाल पाटील, हमीद खाटीक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: A warning of the bear movement of primary teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.