दुस:या दिवशीही जिल्ह्यात पाणी-बाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:39 PM2019-08-06T12:39:23+5:302019-08-06T12:40:00+5:30
तळोदा : नुकसानीचे पंचनामे सुरू लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खर्डी नदीच्या पुराचे पाणी शिरुन ...
तळोदा : नुकसानीचे पंचनामे सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खर्डी नदीच्या पुराचे पाणी शिरुन नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांच्या घरांचे पंचनामे येथील महसूल प्रशासनाकडून सोमवारी सुरू करण्यात आले. आतापावेतो शहरातील विविध भागातील सुमारे 280 घरांचे पंचनामे करण्यात आले. पुराच्या पाण्यामुळे धान्याबरोबरच टीव्ही, फ्रीज या वस्तूंचेही नुकसान झाले आहे. काहींच्या शेळ्या, कोंबडय़ाही वाहून गेल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे. दरम्यान, प्रशासनाने निदान स्वस्त धान्य दुकानातून धान्य तरी उपलब्ध करून देण्याची मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.
रविवारी पहाटे शहराबरोबरच संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील चारही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील खर्डी नदीबरोबरच ग्रामीण भागातील नदी-नाल्यांना पूर आला होता. या पुरामुळे नदीकाठावरील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. परिणामी मोठय़ा प्रमाणात घरांचे व घरातील धान्य, विजेची उपकरणे, संसारपयोगी साहित्याचे नुकसान झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर तहसीलदार पंकज लोखंडे यांनी महसूल कर्मचा:यांची सोमवारी बैठक घेऊन नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तळोदा शहराबरोबरच ग्रामीण भागातील ज्या गावांमध्ये नुकसान झाले आहे अशा ठिकाणी कर्मचा:यांनी पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. तळोदा शहरातील नदीकाठावरील प्रधानहाटी, डीबीहाटी, मोठी हाटी, बामआमराई, संत रोहिदास वाडा अशा वेगवेगळ्या ठिकाणी कर्मचा:यांनी नुकसानीचे पंचनामे केले. आजअखेर साधारण 280 घरांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. पंचनाम्याच्या कार्यवाहीत पावसाचा व्यत्यय आला होता. याशिवाय ग्रामीण भागात तलाठय़ांनी कृषी विभागाच्या कर्मचा:यांबरोबर शेतातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले. असे असले तरी पुराच्या पाण्यामुळे नुकसानग्रस्तांचे धान्य मोठय़ा प्रमाणात खराब झाले असून त्यांच्यापुढे धान्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने अशा कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य देण्याची सूचना द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पुनर्वसन समितीच्या
सदस्यांनी दिली भेट
पुराच्या पाण्यामुळे तालुक्यातील रोझवा पुनर्वसन, गोपाळपूर पुनर्वसन, रेवानगर, नर्मदानगर, मोड, त:हावद पुनर्वसन, चिखली अशा प्रकल्पबाधितांच्या घरांमध्ये पाणी साचून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय शेतीचेही नुकसान झाले आहे. या सर्व वसाहतींमध्ये जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य दाज्या पावरा, कैलास वसावे, डॉ.कांतीलाल टाटीया, दिलवरसिंग वसावे यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तातडीने पंचनामे व भरपाईबाबत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
तिखोरा शिवारात शेतात पाणी घुसल्याने नुकसान
शहादा : तालुक्यातील तिखोरा गावाजवळून जाणा:या कन्हेरी नाल्याला आलेल्या पुराचे पाणी शेतात गेल्याने काळ्या कसदार मातीसह पिके वाहून गेल्याने शेतक:यांचे मोठे नुकसान झाले.
3 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तिखोरा गावाजवळून जाणा:या कन्हेरी नाल्याला पूर आल्याने नाल्यालगत असलेली शेतातील काळी व कसदार माती पूर्णपणे वाहून गेली आहे. या महापुरामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा कन्हेरी पुलाजवळील 700 ते 900 मीटर लांबीचा सर्व मुरूमाचे भराव, माती, मोठमोठे दगड, वाळू वाहून पुलाजवळील ङिापरु दत्तू चौधरी, योगराज चौधरी, रवींद्र उखा चौधरी, एकनाथ चौधरी, ललित चौधरी यांच्या शेतात जाऊन पसरलेला आहे. या शेतक:याच्या शेतातील तीन महिन्यांचे कापसाचे पिकही वाहून गेले असून पुरामुळे शेतात फक्त मुरूम, वाळू, दगड हेच दिसत आहे. शासनाने या भागातील शेतक:यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.