चुकीच्या ठिकाणी फरशी बांधल्याने शेतांमध्ये पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:18 PM2019-08-13T12:18:16+5:302019-08-13T12:18:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा-वैजाली रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी फरशी बांधल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागाच नसल्याने शेताला तलावाचे ...

Water in the fields due to the construction of floors in the wrong place | चुकीच्या ठिकाणी फरशी बांधल्याने शेतांमध्ये पाणी

चुकीच्या ठिकाणी फरशी बांधल्याने शेतांमध्ये पाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : प्रकाशा-वैजाली रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी फरशी बांधल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागाच नसल्याने शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे पिके खराब होत असून फरशीचे बांधकाम करणा:यांची चौकशी करून आम्हाला भरपाई द्यावी, अशी मागणी प्रकाशा येथील शेतक:यांनी जिल्हाधिका:यांकडे केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा-वैजाली रस्त्यावर प्रकाशा येथील शेतक:यांच्या शेतजमिनी आहेत. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. शेतातील पाणी निघून चारीत जाते व चारीचे पाणी थेट नदीर्पयत जात होते. या चारीमध्ये फरशीचे बांधकाम करताना ते व्यवस्थित न झाल्याने व खोल न केल्याने हे पाणी निघण्यासाठी जागा नाही. परिणामी ते शेतातच थांबून आहे. यामुळे शेतीला तलावाचे स्वरूप आले असून कापसाचे पिक पाण्यात तरंगत असल्याने पिकांचे नुकसान होत  असून पिके वाया जाणार आहेत. चुकीच्या ठिकाणी फरशीचे   बांधकाम करणा:यांची चौकशी  करून नुकसान भरपाई देण्याची मागणी अनिल पाटील, विश्वास पाटील, परशुराम पाटील, रामचंद्र चौधरी, अशोक पाटील, विश्वनाथ पाटील, योगेश पाटील, देवेंद्र पाटील, लिंबा चौधरी, यांच्यासह अनेक शेतक:यांनी जिल्हाधिका:यांकडे केली आहे.
 

Web Title: Water in the fields due to the construction of floors in the wrong place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.