पूर्व भागात पाणी पातळी खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 11:52 AM2017-09-10T11:52:23+5:302017-09-10T11:52:23+5:30

नंदुरबार तालुका : ऐन पावसाळ्यातही पिक जगविण्यासाठी शेतक:यांची कसरत

 Water level in the eastern area decreased | पूर्व भागात पाणी पातळी खालावली

पूर्व भागात पाणी पातळी खालावली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लहाश शहादे : नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील लहान शहादेसह लगतच्या परिसरातील पाण्याची पातळी खोल गेल्याने पिक जगविण्यासाठी शेतक:यांकडून कसरत करावी लागत आह़े पाणी नसल्याने लगतच्या भागातून पाणी आणून  डेगव्दारे पिकांना पाणी देण्यात येत आह़े
लहान शहादेसह, शिंदे, कोळदे, पळाशी, समशेरपुर, खोंडामळी, बह्याणे-मांजरे, पातोंडा, खोडसगाव या परिसरातील विहिरींची पातळीदेखील खोल गेली आह़े त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतक:यांना मोठी कसरत करावी लागत आह़े काही शेतशिवारात शेतक:यांनी विहिरीत मोटारीदेखील सोडल्या होत्या़ परंतु त्यासुध्दा पाणी ओढणे अकार्यक्षम ठरत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आह़े 
पूर्व भागातील शेतशिवारात कापूस पिक फुलावर आह़े त्यासोबतच ज्वारी मका आदी पिकांचीदेखील लागवड मोठय़ा प्रमाणात करण्यात आली आह़े त्यामुळे त्यांना जगविण्यासाठी पाण्याची सोय आवश्यक आह़े परंतु गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फरवली असल्याने परिसरातील पाण्याची पातळी कमालीची खालावली आह़े पिक जगवावी कशी असा प्रश्न शेतक:यांसमोर निर्माण झाल आह़े काही दिवसात पाऊस आला नाही तर परिस्थिती अधिक गंभीर होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत़
ऑगस्टच्या सुरुवातीलाच काही दिवस पावसाने हजेरी लावली होती़ त्यामुळे शेतक:यांनी शेतीकामांना गती दिली होती़ परंतु त्यानंतर पावसाने दळी मारल्याने शेतक:यांची चांगलीच पंचाईत झाली आह़े पाऊस                   येत नसल्याने नाईलाजाने शेतकरी डेगच्या सहाय्याने पिकांना पाणी   देऊन पिक जगविण्याची धडपड  करीत  आह़े यात त्यांचे संपूर्ण कुटुंबदेखील या कामात लागले आह़े पाऊस येत नसल्याने वारंवार पेरणीचे संकट शेतक:यांसमोर उभे ठाकले आह़े 
परिसरात सुमारे 70 टक्के पेरणी पूर्ण झाली आह़े त्यामुळे पाऊस न आल्यास शेतक:यांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आह़े पाण्याअभावी शेतातील कापूस, ज्वारी, मका आदी पिकांवर संक्रांत आली आह़े त्यामुळे शेतकरी स्वत बैलगाडीच्या सहाय्याने डेगच्या सहाय्याने पिकांना पाणी देत आहेत़
दरम्यान, पिकांसाठी डेगव्दारे पाणी द्यावे लागत असल्याने यात शेतक:यांचे संपूर्ण कुटुंब कामाला लागले आह़े परिसरात मजुरांची कमतरता असल्याने लहानग्यांपासून तर जेष्ठांपर्यत सर्वच कामाला लागले आह़े शेती कामे करावी लागत असल्याने याचा परिणाम विद्याथ्र्याच्या शाळेतील हजेरी पटावर होताना दिसून येत आह़े

Web Title:  Water level in the eastern area decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.