पाणी योजनेचा जलकुंभ ठरतोय जीवघेणा : काकर्दे येथील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:14 PM2018-04-26T13:14:39+5:302018-04-26T13:14:39+5:30

जागोजागी तडे गेल्याने कोसळण्याची भिती

The water scheme of the water plan is due to the fatality: the condition of the Karakr | पाणी योजनेचा जलकुंभ ठरतोय जीवघेणा : काकर्दे येथील स्थिती

पाणी योजनेचा जलकुंभ ठरतोय जीवघेणा : काकर्दे येथील स्थिती

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 26 : तालुक्यातील काकर्दे येथे उभारण्यात आलेला पाणी योजनेचा जलकुंभ कोसळण्याच्या मार्गावर आह़े यातून मोठी जीवितहानी होण्याची भिती व्यक्त होत असताना पंचायत समिती ग्रामपंचायतीकडून जलकुंभ तपासणीच्या अहवालाची प्रतिक्षा करत आह़े यामुळे ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करत आहेत़  
1 हजार 600 लोकसंख्या असलेल्या काकर्दे येथे 1999 मध्ये जलस्वराज्य योजनेंतर्गत जलकुंभ मंजूर करण्यात आला होता़ या जलकुंभात दिवसाला 10 हजार पाणीसाठा करून ते पाणी गावात पुरवण्याचे नियोजन होत़े परंतु पंचायत समितीच्या अभियंत्यांनी मनमानी करून उंचीवर जलकुंभ बांधून दिला होता़ यातून जलकुंभ कायम अर्धाच भरला जात होता़ आधी निकृष्ट असलेल्या या जलकुंभाला गळती लागून स्लॅबच्या सळ्या बाहेर आल्या आहेत़   जलकुंभ कधी कोसळेल याची शाश्वती नसल्याचे सांगण्यात येत आह़े ग्रामपंचायतीने गेल्या काही महिन्यांपूर्वी जलकुंभ तपासणीला यावे असे आमंत्रण शासकीय महाविद्यालयाच्या तज्ञांना देऊनही ते आलेले नाहीत़ तज्ञ येत नसल्याने अहवाल मिळालेला यातून ग्रामस्थांची चिंता वाढत असून जलकुंभ कोसळल्यास जबाबदार कोणास धरावे, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत़ 
गावातील सर्वात उंच जागेवर हा जलकुंभ 1999 साली उभारण्यात आले होत़े उंचावर असलेल्या जलकुंभात पाणी जात नसल्याने गावात बाराही महिने पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली़ उन्हाळ्यात जलकुंभ पूर्णपणे कोरडा रहात असल्याचा प्रकार घडत होता़ विशेष म्हणजे पाणी चढवण्यासाठी लागणा:या मोटारींचा खर्च करूनही यश आलेले नव्हत़े या जलकुंभाच्या तळातून पाण्याची गळती होत असून रोज स्लॅबचे तुकडे पडत असल्याचे काकर्दे ग्रामस्थांचे म्हणणे आह़े खंडेराव मंदिर परिसरात असलेल्या जलकुंभाच्या परिसरात मोठी लोकवस्ती आह़े यातील काँकिट किंवा जलकुंभच कोसळल्यास मोठी जिवितहानी होण्याची दाट शक्यता असल्याचे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने काही महिन्यांपूर्वी पंचायत समितीकडे पाठपुरावा केला होता़ यात ग्रामसभेत नवीन जलकुंभ उभारण्याचा ठराव होता़ या ठरावाला मात्र पंचायत समितीने शेरा मारून अभियांत्रिकी तज्ञांच्या तपासणी अहवालाची मागणी करून फेटाळून लावला़ यामुळे ग्रामपंचायतीने धुळे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात संपर्क करून तपासणी करण्याचे सूचित केले होत़े 
 

Web Title: The water scheme of the water plan is due to the fatality: the condition of the Karakr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.