112 गावे आणि 169 पाडय़ांमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 01:02 PM2019-01-23T13:02:39+5:302019-01-23T13:02:43+5:30

नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई कृती आराखडय़ाच्या दुस:या टप्प्याला सुरुवात झाली आह़े यांतर्गत जिल्ह्यातील 112 गावे आणि 169 पाडय़ांमध्ये ...

Water shortage in 112 villages and 169 ponds | 112 गावे आणि 169 पाडय़ांमध्ये पाणीटंचाई

112 गावे आणि 169 पाडय़ांमध्ये पाणीटंचाई

Next

नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई कृती आराखडय़ाच्या दुस:या टप्प्याला सुरुवात झाली आह़े यांतर्गत जिल्ह्यातील 112 गावे आणि 169 पाडय़ांमध्ये टंचाई निवारणाच्या कामांना सुरुवात होणार असून जानेवारी ते मार्च दरम्यान हा आरखडा राबवला जाणार आह़े   
जिल्ह्यात यंदा केवळ 67 टक्के पाऊस झाल्याने टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून पहिल्या टप्प्यात 109 गावे असताना दुस:या टप्प्यात तब्बल 112 गावांचा समावेश झाल्याने दुष्काळीस्थितीची भिषणता समोर येत आह़े कृती आराखडय़ात विहिरीचे खोलीकरण, तलावातून गाळ काढणे, विहिरींचे अधिग्रहण करणे, टँकर सुरु करणे, विंधनविहिरी आणि तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना मंजूरी देण्यात आली आह़े टंचाईग्रस्त गावांसाठी मंजूर करण्यात आलेल्या उपाययोजनांसाठी शासनाने निधीची तरतूद केली असून ग्रामपंचायतींनी पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव दिल्यानंतर या कामांना वेग येणार आह़े तूर्तास सर्वाधिक पाणीटंचाई ही नंदुरबार तालुक्यात असून 45 नवीन टंचाईग्रस्त गावे समोर आली आहेत़ या 45 पैकी किमान 39 गावांनी विहिर अधिग्रहणाचे प्रस्ताव दिले असून या प्रस्तावानुसार तहसील कार्यालयांकडून कारवाई करण्यात येत आह़ेया गावांमध्ये येत्या मार्च महिन्यार्पयत पुरेल एवढा पाणीसाठा नसल्याने त्यापूर्वीच उपाययोजना केल्यास पुढील काळातील भीषण टंचाईपासून गावे मुक्त होणार आहेत़ 
कृती आराखडय़ात नवापूर तालुक्यातील 16 गावे आणि 2 पाडे, शहादा 41 गावे आणि 15 पाडे, तळोदा 7 गावे आणि 5 पाडे, अक्कलकुवा केवळ 1 गाव, धडगाव 2 गावे आणि 137 पाडे टंचाईग्रस्त म्हणून समाविष्ट करण्यात आले आहेत़ या गावांमध्ये 13 ठिकाणी खोलीकरण, 39 विहिर अधिग्रहण केले जाणार आह़े आराखडय़ानुसार तात्काळ पाणी पुरवठा योजनांचे 13 प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त झाले आहेत़ या प्रस्तावांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती असून विभागाने 112 गावे आणि 169 पाडय़ांसाठी 194 विंधनविहिरी मंजूर केल्या आहेत़ यापैकी तूर्तास 22 विंधनविहिरींची खोदाई पूर्ण झाल्याची माहिती आह़े सपाटीच्या गावांमध्ये यंदाही टँकरची गरज नसल्याचे आराखडय़ात म्हटले आह़े नंदुरबार तालुक्यातील भागसरी, धामडोद, कलमाडी, नगाव, आराळे, बह्याणे, अक्राळे, वटबारे, दुधाळे, भोणे, वावद, वनकुटे, आखतवाडे, रजाळे, धमडाई, आडची, होळ तर्फे हवेली, पातोंडा, फुलसरे, बद्रङिारा (सुंदरदे), पिंपळोद, ईसाईनगर, तलाईचापाडा, गुजरजांबोली, बद्रङिारा (गु़जा), राजापूर, केसरपाडा, वेळावद, धुळवदपाडा, व्याहूर, गुजरभवाली, भांगडा, वाघशेपा, मालपूर, वाघोदा, ढंढाणे, खैराळे, राकसवाडे, घुली, जुने सोनगीर, खोंडामळी, खोक्राळे, कोठली खुर्द, पथराई, वडझाकण़ 
शहादा तालुक्यातील ओझर्टा, उजळोद, कवठळ त़श, कुकावल, कोठली त़सा, कुरंगी, गोगापूर, चिरखान, चांदसैली, चांदसैलीचा घोडलेपाडा, जावदे त़ह, टेंभे त़श, टेंभली, होळ गुजरी, आसुस, दामळदा, धांद्रे बुद्रुक, नागङिारी, नंबरपाडा, अंधारपाडा, आदल्यापाडा, भुरीनमळपाडा, कुंडय़ापाणी, शंकरपाडा, आमलीपाणी, कहाटूळ, निंभोरा, जयनगर, उभादगड, न्यू असलोद, पिंपर्डे, भोंगरा, मंदाणा, बामखेडा त़त़, बोराळे, भातकुट, जाम, भोरटेक, चिखली खुर्द, भुलाणे, सटीपाणी, मलगाव, राणीपूर, केलापाणी, लोंढरे, लक्कडकोट, लोहारे, तिधारे, कलमाड त़ह़, वरुळ त़श, सोनवद त़श, सावळदा, लोणखेडा, नांदर्डे, अभणपूर, वाघोदा़ 
तळोदा तालुक्यात खर्डी बुद्रुक, कालीबेल, पाडळपूर, खर्डी खुर्द चिलीपाणी, गढावली, भवर, अमोणी, केलापाणी, अलवाण, अक्राणी, दलेलपूर, पांढूर्केपाडा, त:हावद आणि गंगानगर तर अक्कलकुवा तालुक्यात लालपूर या एकमेव गावाचा आराखडय़ात समावेश आह़े 
 

Web Title: Water shortage in 112 villages and 169 ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.