दहेल व देव नदीवरील धबधबे ओसंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:41 PM2020-07-27T12:41:12+5:302020-07-27T12:41:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सातपुड्याच्या अतिदुर्गम नैसर्गिक हिरवळीच्या पर्वत रागांमधील दहेल नदी व देव नदीच्या संगमाने नैसर्गिक वनराईत ...

The waterfalls on the Dahel and Dev rivers overflowed | दहेल व देव नदीवरील धबधबे ओसंडले

दहेल व देव नदीवरील धबधबे ओसंडले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : सातपुड्याच्या अतिदुर्गम नैसर्गिक हिरवळीच्या पर्वत रागांमधील दहेल नदी व देव नदीच्या संगमाने नैसर्गिक वनराईत निर्मित असलेला दहेलचा खळखळून वाहणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करू लागला आहे.
सातपुड्याच्या अतिदुर्गम व डोंगराळ भागात अक्कलकुवा तालुक्यातील दहेल येथे नैसर्गिक सौंदर्यात असलेल्या धबधब्याला पाहण्यासाठी गुजरातमधून डेडीयापाडा, देवमोगरा, तिनईघाट, वालबा, चिखली, मोगरा या रस्त्याने पर्यटक दहेलच्या धबधब्याला भेट देत असत तर पुणे, मुंबई, धुळे, नाशिक व नंदुरबार या परिसरातील अक्कलकुवा, मोलगी, साकलीउमर, सरी या मार्गानेही नैसर्गिक सौंदयार्चा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत असतात.
या धबधब्याला जवळून पाहण्यासाठी ३०० मीटर खाली नागमोडी वळण घेत पायवाटेने उतरावे लागते तसेच याठिकाणी महादेवाची पींड असल्याने मकरसंक्रात व महाशिवरात्रीच्या दिवशी ही भावीक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात. या धबधब्या जवळ जाण्यासाठी रस्ता, संरक्षण कठडे, सौर ऊर्जेचे एलईडी लाईट बसण्यासह आसन व्यवस्थेची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
ग्रामस्थांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही या पर्यटन स्थळांचा अद्याप विकास झालेला नाही. दहेल आणि देव नदीवर सातपुड्यातील दऱ्या खोºयात जागो जागी सिमेंट बांध, बंधारे बांधून वाहून जाणारे पाणी अडविल्यास सौंदर्यात अधिक भर पडणार आहे. यासाठी वनविभागाने पुढाकार घेत कारवाई केल्यास मोठी अडचण दूर होणार आहे. यातून या भागापर्यंत सुविधा मिळणार आहेत. दहेलच्या पर्वत रांगामधील नैसर्गिक हिरवळीच्या वनराईत असलेल्या धबधब्याला सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटकांची वाढ होण्यास मदत होवून स्थानिक रहिवाशांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तूर्तास येथे पर्यटकांची तुरळक गर्दी दिसून येत आहे.

देव व दहेल नदीच्या संगमस्थानी असलेल्या धबधब्यांच्या ठिकाणी सुविधांची गरज असून, या धबधब्याला जवळून पाहण्यासाठी ३०० मीटर खाली पायवाटेने उतरून जावे लागते. याठिकाणी रस्त्याची गरज असून, संरक्षण कठडे नसल्याने धोकेदायक आहे. विजेची सुविधा, मुक्कामी राहण्याची सोय असणे, तसेच या नद्यावर सिमेंट बांध व बंधारे बांधून पाणी अडविल्यास सौंदर्यात अधिक भर पडेल. दहेलच्या पर्वत रागामधील बारमाही असलेल्या धबधब्याला सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
-करमसिंग वसावे, सरपंच, दहेल

Web Title: The waterfalls on the Dahel and Dev rivers overflowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.