शहाद्यातील अतिक्रमणधारक आमरण उपोषणाच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:32 PM2017-12-30T12:32:48+5:302017-12-30T12:32:53+5:30

On the way to encroachment of martyrdom in Shaadya, | शहाद्यातील अतिक्रमणधारक आमरण उपोषणाच्या वाटेवर

शहाद्यातील अतिक्रमणधारक आमरण उपोषणाच्या वाटेवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा शहरात बसस्थानक परिसरातील अतिक्रमणधारकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेत त्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला आह़े यावेळी व्यथा मांडून तोडगा काढण्याची मागणी केली़ 
शहादा शहरातील बसस्थानक ते स्टेट बँक आणि डोंगरगाव रोड भागात असलेले 100 पेक्षा अधिक अतिक्रमण पालिकेने काढले होत़े यातील बहुतांश अतिक्रमण हे 1995 पूर्वीचे आहेत़ अतिक्रमणधारकांनी याबाबत औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिका, पालिकेचे ठराव यांची माहिती जिल्हाधिकारी यांना देत, पालिकेने पर्यायी जागा किंवा इतर कोणत्या बाबीत सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली़ ऐन दिवाळीत झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली होती़  
निवेदनात म्हटले आहे की, पालिकेच्या कारवाईला अनुकूल प्रतिसाद देऊन स्वखर्चाने साहित्य काढून घेत शासकीय नियमांचे पालन केल़े पालिकेने केवळ ठराव केला आह़े याबाबत पालिका सभागृहात चर्चा झाली नाही़ 1995 पूर्वीपासून या जागांना मुंबई हायकोर्टाने स्थगिती आदेश देऊन पर्यायी जागा दिल्याशिवाय दुकाने हटवू नयेत असे म्हटले होत़े विद्यमान जागेवर दुकाने होत्या, त्या दृष्टीने केव्हाही कोणत्याही त:हेने अडथळा ठरत नाहीत़ शहादा शहरातील एस़टी़स्टँण्डच्या भिंतीला लागून आत जाण्याच्या आणि बाहेर जाण्याच्या मधल्या भिंतीला लागून असलेल्या जुन्या गटारीच्या पलीकडे ही दुकाने सुरू होती़ पालिकेकडून येथील अतिक्रमण काढूनही ही जागा वापरात येणे शक्य नाही़ येथून वाहतूक करणे शक्य नाही़ या दुकानांच्या माध्यमातून सर्वाचा उदरनिर्वाह सुरू होता़ यामुळे या जागेची पाहणी करून पुढील कारवाई करण्याचे म्हटले आह़े
प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार शिराळकर, नथ्थू साळवे, सुनिल गायकवाड, रवि मोरे, रमाकांत बच्छाव, गोविंद मराठे, गिरीष शर्मा, विठ्ठल सोनार, फरीद खान पठाण, संदीप पानपाटील, ताराबाई धोबी यांच्यासह अतिक्रमणधरक उपस्थित होत़े 
 

Web Title: On the way to encroachment of martyrdom in Shaadya,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.