आठवड्यात तापमान चाळीशी गाठणार
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: March 17, 2019 11:57 AM2019-03-17T11:57:47+5:302019-03-17T11:59:20+5:30
‘आयएमडी’चा इशारा : शुष्क व उष्ण वाऱ्यांचा प्रभाव वाढणार, नंदुरबारचा पारा ३७ अंशावर
संतोष सूर्यवंशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पूर्वेकडून येत असलेल्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांमुळे खान्देशसह उत्तर महाराष्ट्रात येत्या आठवड्यात तापमान चाळीशीपार जाणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’ तसेच ‘स्कायमेट’ या खाजगी हवामान संस्थेकडून वर्तविण्यात आला आहे़
पुढील काही दिवसात होणाºया तापमान वाढीची चाहूल नंदुरबारकरांना शनिवारी लागली़ नंदुरबारात तब्बल ३७ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली़ तर जळगाव व धुळे जिल्ह्यात कमाल तापमान अनुक्रमे ३६.३ व ३७.६ इतके नोंदविण्यात आले़
उन्हाळ्याची सुरुवात झाली असल्याने पुर्वेकडून मोठ्या प्रमाणात उष्ण वारे वाहत आहेत़ त्याच प्रमाणे येत्या काही दिवसांमध्ये शुष्क वाऱ्यांचा प्रभाव जाणवनार असल्याचे ‘आयएमडी’कडून सांगण्यात आले आहे़ त्यामुळे साहजिकच जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राच्या कमाल तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़
सध्या हिमालयाच्या पायथ्याशी ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ तर मध्य प्रदेशच्या मध्य भागाच्या वर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे़ त्यामुळे पुर्वेकडून उष्ण वाºयांचा प्रभाव राज्यभरात वाढताना दिसून येत आहे़ यामुळे संभाव्य तापमान वाढ होणार आहे़
दरम्यान, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत वाढ झालेली आहे़ तर काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झालेली बघायला मिळाली़ विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचीत वाढ झालेली आहे़ राज्यात उर्वरीत भागात कमाल व किमान तापमान सरासरीच्या जवळपास राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे़
दरम्यान, १७ मार्च रोजी विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे़ तर खान्देशसह उत्तर महाराष्ट्र तापमान कोरडे व उष्ण राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ दरम्यान, १७ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह, सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा इशारा ‘आयएमडी’ पुणेतर्फे देण्यात आला आहे़
दरम्यान, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळापुर्वीची स्थिती निर्माण झालेली आहे़ तसेच बाष्पीभवन होऊन पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़ दरम्यान, हा कमी दाबाचा पट्टा विदर्भाच्या उत्तरेकडे निर्माण झाला आहे़ त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेले आहे़
तापमानात वाढ होणार असल्याचे याचा जनजीवनावर परिणाम होताना दिसून येत आहे़ नंदुरबारात दुपारच्या वेळी मुख्य वर्दळीच्या ठिकाणी बºयापैकी शुकशुकाट असल्याचे दिसून येत आहे़
नंदुरबारात सध्या ताशी १२ किमी वेगाने वारे वाहत आहेत़ वाºयाचा बºयापैकी प्रभाव जाणवत असल्याने साहजिकच धुळीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे़ नंदुरबारात शनिवारी कमाल ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे़ तर १ हजार ५ हेक्टापास्कल इतका हवेचा दाब निर्माण झालेला होता़ आद्रता साधारणत २९ टक्के इतकी होती़ आद्रतेत हळुहळु वाढ होणार असल्याने साहजिकच उकाड्यातही वाढ होणार असल्याची शक्यत व्यक्त करण्यात येत आहे़
दरम्यान, पंजाब, हरियाना, छत्तीसगढ, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आदी राज्यांमधून कमी दाबाचा पट्टा जात असल्याने या ठिकाणी सरासरीच्या तुलनेत तापमानात किंचित वाढ जाणवणार आहे़ त्यामुळे येथील उष्ण लहरींमुळे महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी उष्णतेची लाट पसरण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेला आहे़ पुढील काही दिवस अशीच स्थिती कायम राहणार आहे़