एसटीवरील ‘भार’ वाढला़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 12:41 PM2017-10-03T12:41:38+5:302017-10-03T12:41:38+5:30

सुरत-भुसावळ मार्गाचे दुहेरीकरण : रेल्वेच्या अनियमिततेचा परिणाम

 The 'weight' on ST grew | एसटीवरील ‘भार’ वाढला़

एसटीवरील ‘भार’ वाढला़

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सुरत-भुसावळ मार्गावर होत असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून काही रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या़ त्यामुळे परिणामी प्रवाशांचा भार आता एसटी बसेसवर वाढताना दिसून येत आह़े 
सुरत-भुसावळ रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यात येत आह़े त्यामुळे या मार्गावर धावणा:या चार गाडय़ांचे शेडय़ुल्ड रद्द करण्यात आले आह़े त्यात, सायंकाळी नंदुरबार येथून असलेली अमरावती एक्सप्रेस, रात्री 11 वाजता असलेली भुसावळ-सुरत पॅसेंजर, तसेच रात्री साडे नऊ वाजेची सुरत-भुसावळ, रात्री चार वाजता असलेली भुसावळ-सुरत व सुरत-भुसावळ या गाडय़ा रेल्वे प्रशासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या़ तसेच अहमदाबाद-चैन्नई नवजीवन एक्सप्रेस, हावरा या गाडय़ाही आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावत असल्याने यामुळे प्रवाशांचे हाल होत होत़े याबाबत नंदुरबार येथील रेल्वेस्थानक प्रबंधक बी़एल़ मंडल यांच्याशी संवाद साधला असता, मंगळवारपासून सर्व गाडय़ा नियमित वेळेनुसार धावणार असल्याचे त्यांनी सांगितल़े  
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रेल्वेची सेवा काहीशी  विस्कळीत झाल्याने नंदुरबार ते भुसावळ दरम्यानच्या मार्गावर प्रवास करणा:या प्रवाशांकडून पर्याय म्हणून एसटी बसेसचा वापर करण्यात येत आह़े यामुळे याचा अतिरिक्त भार एसटी बसेसना सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आह़े सध्या सणासुदीचे दिवस असल्याने मोठय़ा संख्येने प्रवासी ये-जा करीत असल्याने प्रवासी संख्येत अधिकच  भर पडत असल्याचे चित्र दिसून येत आह़े
एक्सप्रेस झाल्या पॅसेंजर.
दोंडाईचा ते पाळधी दरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले असून नंदुरबार ते दोंडाईच्या या मार्गावरील दुहेरीकणाचे काम अद्याप करण्यात येत आह़े त्यामुळे दुहेरीकरणाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून संबंधित रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या़ तर ज्या रेल्वेगाडय़ा सुरु ठेवण्यात आल्या होत्या त्यादेखील ब:याच छोटय़ा-छोटय़ा रेल्वे स्थानकावर  बराच वेळ थांबून असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती़ 
सध्या सणासुदीचे दिवस असल्याने हजारोंच्या संख्येने प्रवासी रेल्वेचा वापर करीत असतात़ प्रवाशांचा पैसा व वेळ दोन्हीही वाचत असल्याने प्रवाशांकडून सर्वाधिक पसंती ही रेल्वेलाच देण्यात येत असत़े 
परंतु काही दिवसांपासून रेल्वेफे:या अनियमित असल्याने प्रवाशांना तासन्तास रेल्वे स्थानकावर वाट बघावी लागत आह़े त्यामुळे याला पर्यायी म्हणून प्रवाशांकडून एसटी बसेसना पसंती देण्यात येत असल्याचे चित्र नंदुरबारात दिसून येत आह़े 
दरम्यान, सोमवारीसुध्दा रेल्वेफे:या अनियमित असल्याने प्रवाशांची गर्दी बसस्थानकावर होत असल्याचे चित्र दिसून येत आह़े यामुळे याचा  भार बसेसवर दिसूनही येत आह़े 
नंदुरबार-धुळे, नंदुरबार-जळगाव आदी बसेसमध्ये प्रवाशांची मोठय़ा संख्येने गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आह़े प्रवासी वाहतुकीमुळे एकीकडे परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात भर पडत असली तरी अतिरिक्त गर्दीमुळे प्रवाशांची मात्र यातून गैरसोय होत असल्याचे चित्र दिसून येत आह़े 
बसफे:याची वाढ करावी
दरम्यान, सणासुदीमुळे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता परिवहन विभागाकडून जादा भारमान असलेल्या मार्गावरील बसफे:यांमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी आता प्रवाशांकडून करण्यात आली आह़े नंदुरबार-धुळे, नंदुरबार-जळगाव नंदुरबार-शिरपूर तसेच नंदुरबार दोंडाईचा आदी मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी असत़े त्यामुळे साहजिकच या मार्गावर अधिकच्या बसफे:या होणे गरजेचे आह़े या मार्गावर प्रवाशांचे जादा भारमान असल्याने यातून परिवहन महामंडळाला चांगले उत्पन्न मिळत असल्याचे सांगण्यात    येत असत़े त्यामुळे याकडे परिवहन विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आह़े

Web Title:  The 'weight' on ST grew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.