अंत्योदय एक्सप्रेसचे नंदुरबारात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 12:22 PM2017-10-09T12:22:04+5:302017-10-09T12:22:15+5:30

उधना-पटना : नंदुरबार, अमळनेर, जळगाव थांबा

 Welcome to the Antyoday Express at Nandurbar | अंत्योदय एक्सप्रेसचे नंदुरबारात स्वागत

अंत्योदय एक्सप्रेसचे नंदुरबारात स्वागत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पूर्व मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या उधना-पटना-जयनगर या (15564-15563) अंत्योदय एक्सप्रेसचे नंदुरबार स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. रविवारपासून या साप्ताहिक गाडीचा  शुभारंभ करण्यात आला. या गाडीला खान्देशात भुसावळ, जळगाव, अमळनेर व नंदुरबार असा थांबा देण्यात आला आह़े
8 ऑक्टोबर रोजी या गाडीचा औपचारिक शुभारंभ उधना स्थानकातून करण्यात आला. उधना येथून सकाळी आठ वाजून 50 मिनिटांनी सुटली. दुपारी साडेतीन वाजता नंदुरबार स्थानकात आल्यावर या गाडीचे स्वागत करण्यात आले. खासदार डॉ.हिना गावीत, रेल्वे सल्लागार समितीचे मोहन खानवाणी, जवाहर जैन, जितेंद्र राजपूत, प्रकाश चौधरी, अॅड.उमा चौधरी उपस्थित होते. पटना-जयनगरहून प्रत्येक शुक्रवारी 1 वाजून 20 मिनीटांनी सुटणार आह़े 
दरम्यान, ही एक्सप्रेस पूर्णपणे अनारक्षित असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या गाडीचे आरक्षण करता येणार नाही़ अंत्योदय एक्सप्रेस मध्ये साधारण श्रेणीमध्ये 16 तर एसएलआरमध्ये 2 कोच असे एकूण 18 कोच असणार आह़े यामुळे गुजरात व उत्तर भारतात या मार्गावर प्रवास करणा:या प्रवाशांची चांगली सोय होणार आह़े ही रेल्वे सर्व आधुनिक सुख सोयींनी सुसज्ज आह़े

Web Title:  Welcome to the Antyoday Express at Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.