देवेंद्र फडणवीस यांचे सारंगखेडा येथे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:31 AM2021-09-19T04:31:14+5:302021-09-19T04:31:14+5:30
येथील चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, माजी उपसरपंच देवेंद्रसिंह रावल, रावल स्टोन मेटलचे संचालक रणवीरसिंह ...
येथील चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, माजी उपसरपंच देवेंद्रसिंह रावल, रावल स्टोन मेटलचे संचालक रणवीरसिंह रावल, दत्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष अंबालाल काशिनाथ पाटील, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, सचिव भिकन पाटील, संचालक, डॉ. सुभाष फुलंब्रीकर, ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे, ग्रामपंचायत सदस्य, अनरदचे सरपंच किशोर पाटील, किशोर गिरासे, विनोद गिरासे व भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुष्पहार घालून व ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीने फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्यासोबत आमदार जयकुमार रावल, भाजपचे धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, कामराज पाटील, रामकृष्ण मोरे आदी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे, मंडळ अधिकारी जुबेर पठाण, तलाठी एस. एन. डिगराळे, मंदिर संस्थानचे संचालक, भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या वेळी सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ व कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला.
दत्ताला प्रार्थना
शहादा येथील नियोजित कार्यक्रमाला उशीर झाल्याने देवेंद्र फडणवीस यांनी श्री एकमुखी दत्तप्रभू मंदिराच्या रस्त्यालगत असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराला नमस्कार करीत दत्तप्रभू महाराष्ट्र १०० टक्के कोरोनामुक्त करा, अशी प्रार्थना करतो. दत्ताच्या उत्सवाला नक्कीच दत्ताचे दर्शन घेऊ असे सांगत ते मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला नतमस्तक होऊन पुढे मार्गस्थ झाले.