नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात विहिरी गेल्या खोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:44 PM2018-02-11T12:44:11+5:302018-02-11T12:44:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात उन्हाळ्या आधीच विहिरीतील पाणी खोल गेल्याने पाणीटंचाईच्या झळा येथे आतापासूनच सोसाव्या लागत आहेत़ येथील कुपनलिकादेखील पूर्णक्षमतेने पाणी ओढत नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आह़े
यंदाच्या पावसाळ्यातसुध्दा नेहमीप्रमाणे तालुक्यातील पूर्व भाग कोरडाच राहिला आह़े परिणामी शनिमांडळ, लहान शहादे, रनाळे आदी गावांना यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या संकटांना सामोरे जावे लागणार आह़े येथील नद्या-नाले, विहिरी, लघुप्रकल्पांमध्ये पाण्याची पातळी कमालीची खालावली आह़े यामुळे बळीराजाची पिकेही धोक्यात आली असल्याने तोही चिंतेतच आह़े
यंदाच्या पावसाळ्यात शेतक:यांनी जसातसा रब्बी हंगाम घेतला होता़ पावसाळा संपल्यात जमा असताना देखील अनेक भागात पाण्याची कमतरता जाणवत होती़ त्यामुळे पाण्याअभावी रब्बी हंगाम संकटात सापडला होता़ पिकांसाठी पाणी आणावे कोठून असा प्रश्न शेतक:यांसमोर होता़ शनिमांडळ येथील दोन्ही धरणात तीन फुटही पाणी नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े
जाणकारांच्या म्हणण्यानुसार रब्बी हंमागासाठी या धरणातील पाणीसाठा साधारणत 25 फुटार्पयत असल्यावरच संपूर्ण हंगाम पूर्ण क्षमतेने येत असतो़ अशीच परिस्थिती ठाणेपाडा लघु प्रकल्प आह़े नंदुरबार तालुक्यातील लहान शहादेसह लगतच्या परिसरात पाण्याअभावी शेतक:यांचा विविध पिके करपू लागली आहेत़ त्यामुळे शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े