ब्राrाणपुरी येथून ट्रॅक्टर ट्रॉलींची चाके लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:14 PM2019-07-08T12:14:21+5:302019-07-08T12:14:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी येथे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीचे प्रत्येकी एक चाक चोरटय़ांनी लांबवल्याची घटना रविवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी येथे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीचे प्रत्येकी एक चाक चोरटय़ांनी लांबवल्याची घटना रविवारी उघडसीस आली. गाव व परिसरात भुरटय़ा चोरांचा उच्छाद सुरूच असल्याने नागरिक वैतागले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, ब्राrाणपुरी येथील माधव जगन्नाथ पाटील व डिगंबर लिमजी पाटील यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर ट्रॉली त्यांनी आपल्या खळ्यात उभ्या केल्या होत्या. रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास माधव पाटील यांचे ट्रॅक्टर चालक आपसिंग पावरा यांना दोन्ही ट्रॉलीचे एक-एक चाक दिसून आले नाही. त्यांनी ट्रॉली मालकांना याबाबत सांगितले. चोरटय़ांनी दोन्ही ट्रॉलीचे एक-एक चाक लंपास केल्याचे निदर्शनास आले. ब्राrाणपुरी परिसरात मोटारसायकलींची चाके चोरीचे सत्र सुरू असताना आता चोरटय़ांची नजर आता शेतीपयोगी यंत्रांच्या चाकांवर पडली आहे. आता शेतक:यांनी आपली शेतीपयोगी वस्तू व यंत्रे कुठे ठेवावीत, असा प्रश्न पडला आहे. परिसरात भुरटय़ा चोरांचा उच्छाद सुरूच असून पोलिसांनी त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.