औद्योगिकरणाचे चाके कधी फिरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:54 PM2019-08-22T12:54:58+5:302019-08-22T12:55:04+5:30

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एमआयडीसी रखडल्याने शासनाने या ठिकाणी मंजूर केलेला टेक्स्टाईल पार्कदेखील आता धोक्यात ...

Whenever the wheels of industrialization rotate | औद्योगिकरणाचे चाके कधी फिरणार

औद्योगिकरणाचे चाके कधी फिरणार

Next

मनोज शेलार । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एमआयडीसी रखडल्याने शासनाने या ठिकाणी मंजूर केलेला टेक्स्टाईल पार्कदेखील आता धोक्यात आला आहे. सुरत येथील इच्छूक उद्योजकांनी पाठ फिरवली आहे. वेळेवर एमआयडीसी उभी राहत नसल्याने  टेक्स्टाईल पार्कचे भवितव्यदेखील अधांतरी आहे. दरम्यान, भालेर एमआयडीसीत अंतर्गत रस्ते, विजेची सोय आदी कामे करून प्लॉट पाडण्याचे काम रेंगाळले असून पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याकडेही फारसे गांभिर्याने पाहिले जात नसल्यामुळे एमआयडीसीचे भवितव्य अधांतरीच आहे. 
राज्य शासनाने दोनवर्षापूर्वी भालेर एमआयडीसीमध्ये ‘वस्त्रोद्योग पार्क’ अर्थात टेक्स्टाईल झोन जाहीर केला होता. यामुळे कापूस उत्पादकांसह बेरोजगार युवकांच्याही अपेक्षा वाढल्या होत्या. सुरत, अहमदाबाद आणि इंदूरची जवळ असलेली बाजारपेठ तसेच कापसाची उपलब्धता यामुळे येथे हा उद्योग अधिक भरभराटीस येऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असले तरी एमआयडीसीचे रेंगाळलेले काम त्याला आडकाठी ठरत आहे.
शहरापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर प्रस्तावित एमआयडीसी साकारली जात आहे. जवळपास चारशेपेक्षा अधिक हेक्टर जागा शासकीय आहे. यानंतरही जागेची आवश्यकता भासल्यास खासगी जागा अधिग्रहीत  करण्यासाठी शासन प्रय}शील राहणार आहे. परंतु सध्यातरी चारशे हेक्टर जागेवरच एमआयडीसी उभी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या जागा सपाटीकरण करून अंतर्गत रस्ते, विजेची सोय केली जात आहे. 
पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रकाशा बॅरेज ते एमआयडीसी अशी 18 ते 20 किलोमीटरची पाईप लाईन टाकली जाणार आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळायची बाकी आहे. त्यामुळे नवीन एमआयडीसीमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उद्योजकांना मिळणार आहेत.
सद्य:स्थितीत टेक्स्टाईल उद्योगाबाबत लगतचे सुरत शहर प्रसिद्ध आहे. परंतु त्या ठिकाणी जागेची मर्यादा आणि कुशल कामगारांची कमतरता यामुळे तेथील उद्योजक लगतच्या शहरांमध्ये येण्यास उत्सुक आहेत. नंदुरबार येथे सुरत येथील चार उद्योजकांनी उद्योगासाठी उत्सूकता दाखविली होती.  नंदुरबारच्या प्रस्तावित एमआयडीसीमधील टेक्स्टाईल झोनमध्ये संबंधित सुविधा उपलब्ध झाल्यास मोठय़ा प्रमाणावर उद्योजकांचा ओढा या भागात असेल यात दुमत नाही. सद्य स्थितीत नवापूर एमआयडीसीमध्ये 80 युनीट सुरू आहेत. स्थानिक ठिकाणी कच्चा  माल आणि कुशल व अकुशल मनुष्यबळ मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध होऊ शकते.  गेल्या पाच ते सात वर्षाची कापूस लागवडीची स्थिती पाहता ती दिवसेंदिवस वाढत   आहे. जिल्ह्याचे सरासरी कापूस लागवड क्षेत्र 48 हजार हेक्टर इतके आहे. परंतु गेल्या काही वर्षात               ते एक लाख हेक्टर्पयत वाढत आहे. 
नंदुरबारात तसेच शहादा येथील सूतगिरणीत कापूस विक्री केला  जातो. खेतिया व सेंधवा  येथील कापूस व्यापारपेठदेखील जिल्ह्यातील कापूस उत्पादकांवर अवलंबून आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. शिवाय गुजरात आणि मध्य प्रदेशातील शेकडो खरेदीदार खेडा खरेदी अंतर्गत             कापूस खरेदी करीत असतात. जर टेक्स्टाईल झोन झाल्यास संबंधित उद्योगांना मोठय़ा प्रमाणावर  कच्चा माल उपलब्ध होऊ शकणार आहे. जिल्ह्यातून सात महामार्ग जातील  अशा रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. सुरत-भुसावळ रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण  झाले आहे. त्यामुळे दळणवळणाचीही समस्या राहणार नाही. अमरावती-सुरत महामार्गाला जोडणारा विसरवाडी ते सेंधवा आणि शेवाळी फाटा ते गुजरात हद्दर्पयतचा महामार्ग नंदुरबारातून जाणार आहे. त्यामुळे गुजरात व मध्य प्रदेशात जाण्यासाठी अर्थात अहमदाबाद, सुरत, बडोदा तसेच इंदूरसारख्या बाजारपेठा कव्हर करण्यासाठी या दोन महामार्गासह ब:हाणपूर-अंकलेश्वर या महामार्गाचीही मोठी मदत मिळणार आहे. त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न निकाली निघणार आहे.

Web Title: Whenever the wheels of industrialization rotate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.