Vidhan Sabha 2019: विजयकुमार गावीत यांच्या विरोधात कोण लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 01:00 PM2019-10-02T13:00:52+5:302019-10-02T13:16:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार  : नंदुरबार विधानसभा मतदारसंघात भाजपने आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांची उमेदवारी मंगळवारी जाहीर केली असून काँग्रेस-राष्ट्रवादी ...

Who will fight against Vijaykumar Gavit? | Vidhan Sabha 2019: विजयकुमार गावीत यांच्या विरोधात कोण लढणार

Vidhan Sabha 2019: विजयकुमार गावीत यांच्या विरोधात कोण लढणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार  : नंदुरबार विधानसभा मतदारसंघात भाजपने आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांची उमेदवारी मंगळवारी जाहीर केली असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मात्र अद्यापही येथे उमेदवार जाहीर न केल्याने त्यांच्याविरोधात कोण लढणार? याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जिल्ह्यातील चारही जागा काँग्रेसच्या वाटय़ाला दिल्या आहेत. काँग्रेसने दोन दिवसांपूर्वीच उमेदवार जाहीर केले. त्यात जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा व शहादा या तिन्ही ठिकाणचे उमेदवार जाहीर केले. पण नंदुरबारमध्ये मात्र उमेदवार जाहीर केला नव्हता. येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चुणूक लागल्यामुळे पक्षाने नंदुरबारचा निर्णय राखीव ठेवल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, रघुवंशींनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून भाजपनेही नंदुरबारची उमेदवारी आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांना जाहीर केली आहे. याठिकाणी रघुवंशी विरुद्ध गावीत अशीच लढत असते. मात्र रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर युतीला त्याचा फायदा होईल. अशा स्थितीत गावीतांच्या विरोधात तोलामोलाचा सक्षम उमेदवार देण्यासाठी काँग्रेस कुठली रणनीती आखते याकडे सर्वाचे लक्ष असून उमेदवार कोण राहील त्याबाबत उत्सुकता लागून आहे. दरम्यान, या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने दीपा वळवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
 

Web Title: Who will fight against Vijaykumar Gavit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.