एसटी बसेसमध्ये मनोरंजनासाठी बसविण्यात आलेले वायफाय केवळ शोभेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:06 PM2017-11-28T12:06:35+5:302017-11-28T12:06:49+5:30

Wi-Fi access for ST buses is not only decorated | एसटी बसेसमध्ये मनोरंजनासाठी बसविण्यात आलेले वायफाय केवळ शोभेचे

एसटी बसेसमध्ये मनोरंजनासाठी बसविण्यात आलेले वायफाय केवळ शोभेचे

Next
कमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाकडून एसटी बसेसमध्ये मोफत मनोरंजनासाठी बसविण्यात आलेले वायफाय केवळ शोभेचे बनले आहेत़ केवळ ठराविकच चित्रपट यात दाखविण्यात येत असल्याने मोफत मनोरंजनाच्या ऐवजी प्रवाशांना मनस्तापच सहन करावा लागत आह़ेनंदुरबार जिल्ह्यातील आगारात सुमारे शंभराहून अधिक एसटी बसेसमध्ये हे मोफत मनोरंजनावर आधारीत वायफाय बसविण्यात आले आह़े परंतु वायफाय असे जरी म्हटले जात असले तरी यात नेट कनेक्टीव्हीटीच नसल्याने वायफायचा अर्थच काय असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आह़े खाजगी बसेसचे आव्हान पेलण्यासाठी तसेच स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाकडून राज्यभरातील हजारो बसेसमध्ये हे वायफाय बसविण्यात आले आह़े सुरुवातीला बसविण्यात आलेल्या या नवीन यंत्राबाबत अनेक प्रवाशांना उत्सुकता होती़ परंतु ही उत्सुकता काही जास्त काळ टिकली नाही़ नेट कनेक्टीव्हीटीच होत नसल्याने अनेक प्रवाशांचा यामुळे भ्रमनिराश झाला आह़े या वायफायअंतर्गत देण्यात आलेल्या युजर आयडी व पासवर्डनुसार केवळ ठराविक चारच चित्रपट प्रवाशांना दिसत आहेत़ त्याच प्रमाणे टीव्ही सिरीयलच्याही ठराविकच मालिकांमधील काही भाग दिसत आहेत़त्यामुळे वारंवार तेच-तेच पाहूण प्रवासीदेखील कंटाळले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आह़े विविध आगारातील बसेसना हे मोफत वायफाय बसविण्यात आले आह़े त्यामुळे याचा वापर प्रवाशांकडून करणे अपेक्षीत आह़े परंतु वारंवार एकच चित्रपट दिसत असल्याने प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागत आह़ेखाजगी वाहनांचे आव्हानपेलण्याचा प्रयत्नसतत तोटय़ात सुरु असलेल्या एसटी महामंडळाला संजीवनी मिळण्याची आवश्यकता आह़े त्यामुळे परिवहन महामंडळाकडून वारंवार शिवशाही बसेससारख्या नवनवीन संकल्पना राबविण्यात येत आहेत़ खाजगी प्रवासी वाहनांचे तोंड देण्यासाठी विविध आधुनिक पध्दतींचा अवलंब करण्यात येत आह़े परंतु यात परिवहन विभागाला यश मिळत नसल्याची स्थिती आह़े आधीच नंदुरबार जिल्ह्यातील विविध आगाराच्या अनेक लांब पल्ल्यांच्या बसेसचे कमी भारमान आह़े त्यामुळे या बसफे:या बंद होतात की काय अशी स्थिती आह़े त्यातच महामंडळाकडून वायफाय सारख्या सुविधांच्या नावाखाली प्रवाशांची थट्टा करण्यात येत असल्याचेही अनेक प्रवाशांकडून सांगितले जात आह़े परिवहन महामंडळाकडून मुंबई येथील एका खाजगी कंपनीला मोफत मनोरंजन वायफाय बसविण्याचे काम दिले आह़े त्याअंतर्गत कंपनीचे कर्मचारी एसटी बसेसमध्ये हे यंत्र बसवित असतात़ सुरुवातीला निवडक बसेसमध्ये हे यंत्र बसविण्यात आले आह़े लवकरच संपूर्ण बसेसमध्ये हे वायफाय यंत्र बसविण्यात येणार असल्याची माहिती आह़े परंतु या यंत्राचा वापरच कुणी करीत नसल्याने परिवहन महामंडळ वेळ व पैसा वाया घालवत असल्याच्या भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आह़े ग्रामीण भागातील प्रवाशांना या वायफाय सुविधेबाबत फारशी माहितीही नसत़े अनेकांजवळ साधे मोबाईलही नसल्याने ही यंत्रे धुळखात पडलेली असल्याचेही सांगण्यात येत आह़े

Web Title: Wi-Fi access for ST buses is not only decorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.