मूलबाळ होत नाही नसल्याने पत्नीचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:42 AM2018-03-14T11:42:46+5:302018-03-14T11:42:46+5:30

गुन्हा : दुधाळे शिवारातील पतीचे कृत्य

Wife's persecution because there is no childhood | मूलबाळ होत नाही नसल्याने पत्नीचा छळ

मूलबाळ होत नाही नसल्याने पत्नीचा छळ

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मूलबाळ होत नाही नसल्याने दुसरे लगअ करण्यासाठी पहिल्या पत्नीचा छळ करणा:या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े छळ करणारा संशयित पती दुधाळे शिवारातील विवेकानंद पार्क येथील रहिवासी आह़े
चंदनाबाई किशोर बागुल (27) रा़विवेकानंद पार्क दुधाळे शिवार, नंदुरबार, यांचा विवाह किशोर नथ्थू बागुल रा़ भोरटीपाडा ता़ साक्री जि़धुळे याच्यासोबत जून 2017 मध्ये झाला होता़ विवाहानंतर किशोर याने विवाहात मानपान व हुंडा दिला नाही, पैसे दिले नाहीत या कारणावरून चंदनाबाई यांचा छळ सुरू केला होता़ तसेच मूलबाळ होत नसल्याने दुसरे लगअ करावयाचे आहे, फारकात दे, अशी वेळोवेळी मागणी मानसिक छळ करून मारहाण करत घराबाहेर काढून देत पळसून ता़ नवापूर येथे माहेरी पाठवले होत़े नंदुरबार येथील विवेकानंद पार्क व भोरटीपाडा येथे वर्षभर घडला़ याबाबत चंदनाबाई यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद देत किशोर बागुल, सासरे नथ्थू राजाराम बागुल, मंगला गोदीराम बागुल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आह़े

Web Title: Wife's persecution because there is no childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.