नवापूरात खांबावरून पडल्याने वायरमनचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:10 PM2018-05-12T13:10:27+5:302018-05-12T13:10:27+5:30

नवापूर येथील घटना : मितभाषी स्वभावाच्या हिरालाल झाल्टेंच्या मृत्यूने हळहळ

Wireman death due to fall from new era | नवापूरात खांबावरून पडल्याने वायरमनचा मृत्यू

नवापूरात खांबावरून पडल्याने वायरमनचा मृत्यू

googlenewsNext

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 12 : शहरातील आंबेडकर चौक व गुजरगल्लीलगत पथदिव्याचे काम करीत असताना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पालिकेचे कंत्राटी विद्युत वायरमन हिरालाल मोतीराम झाल्टे (35) हे खांबावरुन उतरत असताना तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी     झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
विद्युत पथदिव्याचे काम करीत असताना काही मित्रांसोबत थट्टामस्करी झाली व काही सेकंदाच्या अंतराने हिरालाल झाल्टे जमिनीवर कोसळल्याने मित्रांना काय करावे हेच सूचेनासे झाले. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या बरगडय़ांना मोठी हानी पोहोचल्याने उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात प}ी, मुलगा व भाऊ असा परिवार आहे.
घरातील कर्ता पुरुष काळाने हिरावून नेल्याने त्यांच्या कुटुंबीयांसाठी सहानुभूतीच्या दृष्टीकोनातून काही प्रय} करावेत यासाठी माजी नगराध्यक्ष दामू बि:हाडे, माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे व सहका:यांनी जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावीत, नगराध्यक्षा हेमलता पाटील, तहसीलदार प्रमोद वसावे, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे व पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांची पालिकेत भेट घेऊन चर्चा करुन निवेदन दिले. मयत हिरालाल झाल्टे यांच्या परिवारास आर्थिक मदत व मयत हिरालाल झाल्टे यांच्या प}ीस सेवेत सामावून घेण्याबाबतची मागणी त्यांनी केली.नवापूर शहरात पालिकेच्या सर्व विद्युत खांब व जोडण्या यांची इत्यंभूत व खडानखडा माहिती हिरालाल झाल्टे यांना होती. कुणाही नगरसेवकाकडे आपल्या प्रभागातील नागरिकांच्या विद्युत समस्येबाबत तक्रार झाल्यास नगरसेवक सरळ झाल्टे यांना फोन करीत असत. दिवस-रात्र वा सुटी अशी काही एक सबब न मानता नागरी समस्यांचे निराकरण करुन त्या संबंधित नगरसेवकांना काम झाल्याचा संदेश फोन करुन द्यायचा, असा त्यांचा स्वभाव होता. म्हणूनच त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष अय्युब बलेसरिया, बांधकाम सभापती हारुन खाटीक, नगरसेवक आरीफभाई बलेसरिया, दर्शन पाटील, बबिता वसावे, मंगला सैन, विशाल सांगळे, माजी नगरसेवक अजय पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करुन त्यांच्या कुटुंबासाठी काय चांगले करता येईल याविषयी भरत गावीत यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. कुटुंबातील जवळच्या नात्यात 20 मे रोजी लग्न कार्य असल्याने शनिवारपासून ते रजेवर जाणार होते.नवापूर पालिकेच्या नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी हिरालाल झाल्टे यांच्या मृत्यूनंतर तात्काळ त्यांच्या पत्नीस प}ीस नगरपालिकेत मक्त्यावर लावणे व सामावून घेण्याबाबत तथा त्यांना सामावून घेतल्यानंतर त्यांच्या उदनिर्वाहाकरिता त्यापोटी आर्थिक मदत होईल या दृष्टीकोनातून योग्य ते प्रय} करण्याबाबतचे पत्र दिले आह़े नगरपरिषदेच्या पुढील होणा:या सर्वसाधारण सभेत मयत झाल्टे यांच्या प}ीस शासन सेवेत सामावून घेण्याबाबत योग्य तो विनंती प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे लेखीपत्र पालिकेने झाल्टे यांच्या कुटूंबियांना दिले आह़े दरम्यान संबधित मक्तेदार यांच्याकडून आर्थिक मदत देण्याचे म्हटले आह़े चर्चेच्यावेळी माजी नगरसेवक रमला राणा, जितेंद्र अहिरे, मनु बि:हाडे, सुनील वाघ, अजय पाटील व आकाश बि:हाडे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Wireman death due to fall from new era

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.