900 अंगणवाडय़ा इमारतीविना :

By admin | Published: December 4, 2015 12:34 AM2015-12-04T00:34:27+5:302015-12-04T00:34:27+5:30

धुळे : जिल्ह्यात एकूण 2104 अंगणवाडय़ा आहेत. त्यापैकी 906 अंगणवाडय़ांकडे स्वत:ची इमारत नाही.

Without the 900 anganwadi buildings: | 900 अंगणवाडय़ा इमारतीविना :

900 अंगणवाडय़ा इमारतीविना :

Next

धुळे : जिल्ह्यात एकूण 2104 अंगणवाडय़ा आहेत. त्यापैकी 906 अंगणवाडय़ांकडे स्वत:ची इमारत नाही. या अंगणवाडय़ा खासगी जागेत, मंदिरात किंवा जिल्हा परिषदेच्या आवारात भरविल्या जातात, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली.

इमारत नसलेल्यांमध्ये 748 नियमित अंगणवाडय़ा, तर 158 मिनी अंगणवाडय़ांचा समावेश आहे. यापैकी जिल्हा परिषदेकडून 241 कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 232 नियमित, व 9 मिनी अंगणवाडय़ांचा समावेश आहे.

दुर्लक्षाचा परिणाम

विद्याथ्र्याच्या शिक्षणाची सुरुवातच अंगणवाडीपासून होते. हे शिक्षण आनंददायी होण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. प्रत्येक विद्यार्थी शाळेत जावा म्हणून वाडय़ा-वस्त्यांवरही अंगणवाडय़ा सुरू केल्या आहेत. तसेच शाळेत मुलांना पोषण आहारही दिला जातो. इमारत व इतर तांत्रिक कारणांमुळे विद्याथ्र्याचा पायाच जर कमकुवत राहिला तर त्यावर पक्की इमारत कशी उभी राहील? इमारत नसल्यामुळे अंगणवाडी कर्मचा:यांना जागेसाठी खूप कसरत करावी लागते. त्यांना एखाद्याच्या खासगी जागेवर किंवा समाज मंदिरात, मंदिरात अंगणवाडय़ा चालवाव्या लागतात. त्यांच्या इमारतीसाठी शासनाकडून अनुदान मिळत असूनही राजकीय इच्छाशक्तीअभावी 900 अंगणवाडय़ांच्या इमारतींचे काम होऊ शकलेले नाही.

कामांसाठी 6 कोटींची तरतूद

जिल्ह्यामध्ये अंगणवाडय़ांच्या 241 कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी वर्ष 2015-16 साठी बिगर आदिवासी भागासाठी 4 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच आदिवासी भागासाठी 2 कोटी 97 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण विभागाचे सर्व अंगणवाडय़ांना इमारत देण्याचे नियोजन आहे.

इमारतीसाठी खर्चाची तरतूद

बिगर आदिवासी क्षेत्रासाठी अंगणवाडीसाठी एक खोली, किचन शेड, संडास व बाथरूमसाठी 6 लाख रुपये खर्चाची तरतूद आहे, तर आदिवासी क्षेत्रासाठी 6 लाख 60 हजार निधी देण्यात येतो. आदिवासी हा दुर्गम भाग असल्याने येथे सहजासहजी बांधकाम साहित्याची उपलब्धता होत नाही म्हणून 60 हजार रुपये जास्त तरतूद करण्यात येते. इमारतीचे काम ग्रामपंचायद्वारे करून घेतले जात होते. आता हे काम ई-टेंडर काढून ठेकेदारामार्फत करून घेतले जाते.

जिल्ह्यातील स्थिती..

जिल्ह्यामध्ये स्वत:ची जागा असलेल्या 1165 नियमित व 33 मिनी अंगणवाडय़ा आहेत. तर इतर सरकारी जागेत 423 नियमित व 49 मिनी अंगणवाडय़ा भरतात.

खासगी जागेचा उपयोग

जिल्ह्यातील 156 नियमित व 48 मिनी अंगणवाडय़ा खासगी जागांचा उपयोग करतात. तर समाज मंदिर, जिल्हा परिषद शाळेच्या मोकळ्या जागेत भरणा:या 230 अंगणवाडय़ा आहेत.

Web Title: Without the 900 anganwadi buildings:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.