महिलेकडून पोटगीसाठी दिलेले धनादेश हिसकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 12:32 PM2019-10-07T12:32:05+5:302019-10-07T12:32:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुबार : पत्नीला पोटगीरुपाने दिलेले धनादेश परत हिसकावून घेणा:या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुबार : पत्नीला पोटगीरुपाने दिलेले धनादेश परत हिसकावून घेणा:या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े जिल्हा न्यायालयाच्या आवारात 29 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला होता़
शहरातील मन्यार मोहल्ला येथील माहेर असलेल्या निकत परवीन ऊर्फ सिमा मुजफ्फर अली रंगरेज यांनी न्यायालयात पतीविरोधात दावा दाखल केला होता़ दावा मागे घेण्यासाठी रंगरेज अली रा़ बेंगलुरु याने साडेपाच लाख रुपयांची पोटगी देण्याचे निश्चित करुन धनादेश दिले होत़े निकत यांनी खटला मागे घेतल्याचे सांगितल्यानंतर मुजफ्फर अली याने निकत यांच्याकडील धनादेश हिसकावून घेत त्यांना शिवीगाळ केली होती़ याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात संशयित मुजफ्फर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े