उंबर्डी येथील महिलेचा मारेकरी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 12:38 PM2020-04-17T12:38:50+5:302020-04-17T12:38:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील उंबर्डी येथील 50 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचुन खुन झाल्याच्या चवथ्या दिवशी नवापुर पोलीसांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तालुक्यातील उंबर्डी येथील 50 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचुन खुन झाल्याच्या चवथ्या दिवशी नवापुर पोलीसांनी मयताच्या मामेभावास आज अटक केली. त्याने खुन केल्याची कबुली दिली आहे.
जयंत नाहडय़ा गावीत असे संशयीताचे नाव आहे. पोलीस सुत्रानुसार, 13 एप्रिल रोजी सकाळी उंबर्डी गावाच्या पेडाफळी भागात राहणारी 50 वर्षीय संगीताबाई रमेश गावीत या महिलेचा अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन डोक्यात दगड मारुन जिवे ठार केल्याची घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा तपास नवापुरचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी हाती घेत तपासाची चक्रे गतिमान केली.
गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी तपास व शोथ पथके तयार करुन त्यांना मार्गदर्शन केले. आरोपीचा शोध घेण्याचा प्रय} करुन स्वत:ही पोलीस कर्मचारी घेवुन उंबर्डी गाव शिवारात आरोपीचा सुगावा घेण्याचा प्रय} केला. पोलीस विभागाने सतत तीन दिवस तपास करुनही आरोपीचा शोध लागत नसल्याने पोलीस पथकांनी ब:याचशा साक्षीदारांची विचारपुस करुन दरम्यानच्या काळात जंगलात व तलावाच्या आजुबाजुला कोण गेले, कोण दिसले, तेथील प्रत्येक डोंगरावर, शेतात व झोपड्यांमध्ये जावुन माहीती घेवुन असे काही इसम त्या दरम्यानच्या काळात फिरल्याची माहीती घेतली. उंबर्डी गावातील जयंत्या नहाड्या गावीत यास संशयित म्हणुन पोलीसांनी ताब्यात घेतले.
संशयित हा मयताचा मामाचा मुलगा असुन तो दवाखान्यात व अंत्यविधीला सुद्धा हजर होता.
जयंत्या यास अटक करण्यात आली. खुन झाल्याच्या घटनेच्या चवथ्या दिवशीच घटना उघडकीस आली आहे. पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या सोबत पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत, सहाय्यक निरीक्षक दिगंबर शिंपी, जमादार कृष्णा पवार, हवालदार गुमानसिंग पाडवी, सुनिल जाधव, प्रविण मोरे, महेश पवार, अल्ताफ शेख, आदिनाथ गोसावी, जयेश बावीस्कर, आदिनाथ गोसावी, व हरसिंग पावरा यांनी ही कारवाई केली. पोलीसांनी त्याच्या हालचाली टिपलेल्या होत्या. पोलीसांनी त्याला ताब्यात घेवुन पोलीसी हिसका दाखविताच त्याने ढसाढसा रडुन गुन्ह्याची कबुली दिली. खुन करणारा मीच आहे, माझी चुक झाली मला वाचवा असे सांगुन आरोपीने गुन्हा केल्याचे कबुल केले. मयत संगीताबाई हिच्या गावातील वागण्यावरुन व फिरण्यावरुन जयंत्याच्या घरात भांडण होत होते. त्यामुळे जयंत्या याने संगीताबाई जंगलातुन चारा घेवुन घरी जात असतांना तिच्या डोक्यात दगड मारुन तिला जिवेठार मारले. तिचे प्रेत कुणास सापडु नये म्हणुन प्रेत डोंगरात घेवुन जावुन डोंगराच्या नालीत ठेवुन त्याचेवर दगड व पालापाचोळा रचुन टाकला असल्याचे सांगितले.