नंदुरबारात दोन लाखांसाठी सासरच्यांकडून महिलेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:48 AM2017-11-18T11:48:53+5:302017-11-18T11:49:46+5:30
गुन्हा दाखल : विवाहितेची पोलीसात फिर्याद
ल कमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माहेरून दोन लाख आणावेत या मागणीसाठी सुनेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 2014 पासून त्रास होत असल्याचे विवाहितेने फिर्यादीत म्हटले आह़े मालेगाव येथील माहेर व नंदुरबार शहरातील हाटदरवाजा परिसरातील सासर असलेल्या प्रियंका सुनिल सैंदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती सुनील हिंमतराव सैंदाणे, सासरे हिंमतराव संपत सैंदाणे, सासू शोभाबाई हिंमतराव सैंदाणे, जेठ किरण हिंमतराव सैंदाणे, जेठाणी गायत्री किरण सैंदाणे, दीर नंदकिशोर हिंमतराव सैंदाणे, दीराणी हर्षदा नंदकिशोर सैंदाणे सर्व रा़ हाट दरवाजा नंदुरबार यांनी 22 जून 2014 ते 1 सप्टेंबर 2016 या काळात माहेरून कर्ज फेडण्यासाठी दोन लाख आणावेत यासाठी वेळावेळी शारिरिक व मानसिक छळ तसेच शिवीगाळ करत मारहाण केली़ जो र्पयत पैसे आणत नाही, तोवर घरात घेणार नाही असें सांगून घराबाहेर काढून दिल़े नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुरूवारी सर्व सात संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े