महिलेला डाकीण ठरवून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:22 PM2019-10-27T12:22:39+5:302019-10-27T12:22:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महिलेवर डाकीण असल्याचा संशय घेवून मुलाला व बैलाला आजारी पाडल्याचा आरोप करून छळ केल्याप्रकरणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महिलेवर डाकीण असल्याचा संशय घेवून मुलाला व बैलाला आजारी पाडल्याचा आरोप करून छळ केल्याप्रकरणी शेलकुईचा शेनईपाडा, ता.धडगाव येथील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 रोजी ही घटना घडली.
शेलकुई येथील मेहलीबाई खात:या पावरा (50) या महिलेवर गावातीलच तीनजण डाकीण असल्याचा संशय घेत होते. जादू-टोणा केल्यामुळेच मुलाला आणि बैलाला आजारी पाडल्याचा आरोप करीत छळ केला. शिवाय मारहाण देखील केली. जादू-टोणा बंद न केल्यास ठार मारण्याची धमकी देखील त्यांनी दिली. या प्रकाराला कंटाळलेल्या मेहलीबाई पावरा यांनी धडगाव पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी रंजित पावरा, दिपक पावरा, मावडीबाई पावरा यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी विद्या कृत्यांना प्रतिबंध व निमरुलन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक साळवे करीत आहे.